शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात गावठी पिस्तुल लावून चाकूने एकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:12 IST

देवपुरातील घटनेने तणाव : सोन्याची चैन हिसकाविली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मागील भांडणाची कुरापत काढून चार ते पाच जणांनी एकाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावली तर इतरांनी चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली़ याप्रकरणी रात्री ११ वाजेच्या सुमारास देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ याप्रकरणी अजय अमृत कांबळे (रा़ नेहरु नगर, मास्तरवाडी, देवपूर, धुळे) या २५ वर्षीय तरुणाने फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, गेल्या दिड महिन्यांपुर्वी झालेल्या वादाचे पडसाद बुधवारी उमटले़ देवपुरातील बसस्टँडसमोर बोअरींगच्या दुकानासमोर बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्यानंतर एकाने गावठी पिस्तूल काढून अजय कांबळे या तरुणाच्या डोक्यावर लावत जीव घेण्याची धमकी दिली़ तर अन्य चार ते पाच जणांनी कांबळे याच्या पाठीवर चाकूने सपासप वार केल्याने यात गंभीर दुखापत झाली़ याशिवाय हाणामारीत त्याच्या गळ्यातील एक तोळे वजनाची १० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून घेत मारेकºयांनी पोबारा केला़ घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस दाखल झाले होते़ ही घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास झाली़ यामुळे देवपूर बसस्थानकाच्या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ या घटनेनंतर कांबळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अजय अमृत कांबळे याने फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, अनिल बडगुजर (पुर्ण नाव माहित नाही) आणि त्याच्यासोबत असलेले ४ अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात संशयावरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी