शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Dhule Municipal Election 2018 : पिंप्री गावात मतदान केंद्राबाहेर गर्दी मात्र  केंद्रात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:33 IST

सकाळी १०.३० पर्यंत अवघ्या ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

ठळक मुद्देमहापालिकेसाठी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान सुरूपिंप्रीत सकाळी १०.३० पर्यंत अवघ्या ४ मतदारांनी केले मतदानबाळापुरला मात्र मतदारांमध्ये उत्साह

आॅनलाइन लोकमतधुळे : महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे.  महापालिकेच्या हद्दित समाविष्ट झालेल्या पिंप्री गावातील मतदान केंद्राबाहेरही मतदारांची गर्दी होती. मात्र मतदान केंद्रापर्यंत कोणी पोहचत नव्हते. सकाळी १०.३० पर्यंत अवघ्या ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ‘नळांना पाणी सुटत नाही तोपर्यंत कोणी बाहेर पडणार नाही’ अशी चर्चा गावात सुरू होती.महापालिका हद्दित पसिररातील जी १० गावे समाविष्ट झालेली आहेत, त्यात पिंप्री या गावाचाही समावेश आहे. मात्र महापालिकेच्या हद्दित समाविष्ट होण्यास या गावातील ग्रामस्थांचा विरोध होता, तो काही प्रमाणात आजही आहे. त्याचे परिणामही या मतदानावर दिसून येत असल्याची चर्चा होती. पिंप्री गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रभाग १९ चे मतदान केंद्र असून, या ठिकाणी दोन बुथ आहेत. या केंद्रावर एकूण ८९१ मतदार आहेत. पैकी सकाळी १०.३० वाजेपर्यंत बुथ क्रमांक १९/१ वर ४४३ पैकी फक्त २ व बुथ क्रमांक १९/२ वर ४४८ पैकी २ अशा फक्त चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान केंद्राबाहेर गर्दीदरम्यान मतदान केंद्राबाहेर युवक, ग्रामस्थांची बºयापैकी गर्दी दिसून आली होती. मात्र मतदान केंद्रापर्यंत कोणी पोहचत नव्हते. त्यामुळे मतदान केंद्रात शुकशुकाट बघावयास मिळाला. केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता. मात्र मतदानासाठीच कोणी येत नसल्याने, केंद्रावर शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.  ‘नळाला पाणी सुटल्याशिवाय कोणी बाहेर पडत नाही’ अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती. दरम्यान या गावातील बहुतांश नागरिक हे ऊस तोडण्यासाठी जातात. त्याचाही परिणाम मतदानावर होत असल्याचीही चर्चा होती. दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी पिंप्री गावात येऊन ग्रामस्थांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे ग्रामस्थांनीच सांगितले. बाळापूरला मतदारांचा उत्साहदरम्यान पिंप्री गावाच्या उलट स्थिती बाळापूर गावात बघावयास मिळाली. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रभाग ११ चे मतदान केंद्र असून, पाच खोल्यांमध्ये मतदान सुरू होते. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. याठिकाणीही मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मतदान शांततेत सुरू असल्याचे पोलीस कर्मचारी अतुल पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूकDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक