पिंपळनेर : येथील सटाणा रोडवरील २८ वर्षीय नवविवाहिता पॉझिटीव्ह आढळली होती. महिलेवर धुळ्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ११ दिवस उपचार सुरु होते. त्या महिेलेचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तब्बल अकरा दिवसांनी करोनावर मात करुन आपल्या घरी परतलेल्या महिलेचे स्वागत परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करुन केले.पिंपळनेर येथील नवविवाहीता दोन महिने लॉकडाऊनमुळे मुंबई येथे कांदेवली भोईसर येथे अडकल्या होत्या. अडीच महिन्यापुर्वीच तिचे लग्न झाले होते. १५ मे रोजी त्या पिंपळनेरला आल्या. घरी आल्यावर त्या स्वत: हून क्वारंटाईन झाल्या होत्या. मात्र २५ मेला रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने दुसऱ्या दिवशी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तेथून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांनी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे अपर तहसिलदार विनायक थविल यांनी सांगीतले होते. तपासणी ााठी महिलेच्या सोबत गेलेले पती, दिर, गाड़ी ड्रायव्हर तसेच ता. 27 मेस सासु, सासरे, महिलेच्या घरी काम करणारी महिलेसह वडारवाडीतील दोन पुरुषांनाही तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते. असे एकूण आठ जणांचे अहवाल २८ मेला निगेटीव्ह आले होते. तसेच पॉझिटीव्ह महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या तब्बल अकरा दिवसांनी करोनावर मात करुन शुक्रवारी आपल्या घरी सायंकाळी सहा वाजता आल्या. तेव्हा त्यांचे स्वागत फुले उधळत टाळ्या वाजुन करण्यात आले. तसेच महिलेची भाकर, पाणी ओवाळून दुष्ट काढून आरती करण्यात आली. महिलेच्या व परिवाराच्या चेहºयावर आनंद दिसत होता. महिलेस १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबंधीत महिलेने व परिवाराने शासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. शहर कोरोना मुक्त झाल्यामुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.कोरोनावर मात करुन आलेल्या महिलेचे स्वागत करण्यासाठी यावेळी अपर तहसिलदार विनायक थविल, सरपंच साहेबराव देशमुख, ग्रामविकास अधिकारी, डी.डी. चौरे, संभाजी अहिरराव, मंडल अधिकारी प्रमोद राजपुत, ग्रा.पं. सदस्य प्रमोद गांगुर्डे, तलाठी दिलीप चव्हाण, संदिप चौधरी, सी.आर. साळवे, रघु, साळुंके यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पिंपळनेर शहर कोरोना मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 22:04 IST