शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पिंपळनेरला दुचाकी चोरणारी टोळी केली गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:09 IST

पोलीस प्रशासन : १७ दुचाकी जप्त, दोघांना पोलीस तर एकाला न्यायालयीन कोठडी

ठळक मुद्देपकडण्यात आलेले चोरटे हे २० ते २२ वयोगटातील आहे. या संशयितांनी सर्वाधिक हिरो होन्डा शाईन आणि डिस्कव्हर या वाहनांची चोरी केली आहे़ पिंपळनेर सिमेलगत नाशिक जिल्हा व गुजरात राज्याची सीमा आहे़ तेथूनही काही दुचाकी चोरल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या चोरांकडून अजुन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुचाकी चोरणारी टोळी पिंपळनेर  पोलिसांच्या पथकाने पकडली आहे.  त्यांच्याकडून १७ दुचाकी जप्त केल्या आहेत.  याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींची संख्या चार झालेली    आहे. गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती़ पिंपळनेर पोलीस स्टेशनला सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पी़ जे़ राठोड रुजू झाल्यानंतर गावातीलच हॉटेल प्रभात जवळून एकाची दुचाकी लंपास झाली होती़ पोलिसांनी त्याचा तपास करीत होते.  २८ एप्रिल रोजी पिंपळनेर येथील हर्षल ज्ञानेश्वर पाटील (२०) या  संशयिताला अटक केली होती़ त्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती़ त्यातून १७ दुचाकीचा तपास लागला़ यात तीन जणांची नावे समोर आली.  पोलिसांनी त्यांना बुधवारी सायंकाळी अटक केली.  या संशयितांना आज साक्री न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापैकी   सुनील ताराचंद पवार (२२, रा़ इंदिरानगर, पिंपळनेर) आणि जयेश संजय पाटील (२०, हरिओम नगर, पिंपळनेर) यांना  दोन दिवसांची पोलीस कोठडी , तर निलम रेवाजी कुवर (२०, रा़ मांजरी ता़ साक्री) याला १५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटकळ, लोकेश पवार, हेड कॉन्स्टेबल प्रविण अमृतकर, धनंजय मोरे, पोलीस नाईक सुनील जावरे, ललित पाटील, कॉन्स्टेबल भूषण वाघ, विशाल मोहने, ग्यानसिंग पावरा, रविंद्र राजपूत, सुनील साळुंके यांनी तपासकामी परिश्रम घेतले़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस