लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : येथील सटाणा रोड लगत असलेल्या स्वामी समर्थ नगर मध्ये कोरोना संसर्गजन्य रुग्ण आढळून आल्याने पुढील तीन दिवसांसाठी शहर बंद ठेवण्यात आले तर कंटेन्मेंट झोन १४ दिवस बंद ठेवण्या संदर्भातील आदेश अपर तहसीलदार विनायक थविल यांनी जाहीर केला आहे.पिंपळनेर शहरात दि.२६ मे संसर्गजन्य रुग्ण महिला आढळून आल्यानंतर सदर महिला ही कोरोनावर मात करीत घरी परतली़ त्याच काही दिवसांनंतर दि.१३ जून रोजी शहरातील स्वामी समर्थ नगर येथील कोरोना संसर्गजन्य रुग्णाचा रिपोर्ट रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी प्रशासनाने पुढील तीन दिवसांसाठी दि. १४ ते १६ पर्यंत संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ यात मेडिकल व वैद्यकीय सेवा यांना वगळण्यात आले असून तिथे संपूर्ण सेवाही बंद राहील तसेच बाधित रुग्णाच्या क्षेत्रापासून कंटेनमेंट झोन हा जाहीर करण्यात आलेला आहे यात पूर्वेस मंगलमुर्ती नगर, अवधूत नगर तर पश्चिमेस साईबाबा कॉलनी, नाना चौक उत्तरेस पंचमुखी कॉर्नर शुभम लॉज पर्यंत तर दक्षिणेस सगरवंश नगर, एन के पाटील नगर असा हा कंटेन्मेंट झोन पुढील १४ दिवसांसाठी ३०० मीटर पर्यंत पूर्णपणे बंद राहील़ तर दीड किलोमीटर बफर झोन राहील आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.कोरोना संसर्गजन्य रुग्ण आढळून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पीएसआय भूषण हांडोरे व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ सटाणा रोड, बाजार पेठ व बस स्टॅन्ड परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यास सुरुवात केली तसेच फळविक्रेते खेड्यावरून आलेले नागरिकांना तात्काळ घरी जाण्याची सूचना देण्यात आली़ पोलीस व्हॅन गाडीतून करीत काही वेळेतच पूर्ण शहर बंद करण्यात आले़तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निजंर्तुकीकरण काम सुरू करण्यात आले आहे तसेच आरोग्य विभागने कंटेन्मेंट झोनमध्ये पथक तयार करून सर्वांची माहिती घेऊन तपासली केली जाणार आहे.शहरात आता दुसरा कोरोना संसर्गजन्य रुग्ण मिळाल्याने त्यांच्या संपर्कातील पाच व्यक्तीची वैद्यकीय तपासणीसाठी पथक नेण्यात आले आहे. आता या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणी होणाऱ्या अहवालाकडे शहराचे लक्ष लागून आहे. तसेच कोरोना या संसर्गजन्य आजाराविषयी माहिती देऊन खबरदारीचा इशारा म्हणून नागरिकांनी कंटेन्मेंट झोन मध्ये पुढील काही दिवस जाऊ नये, शासन आदेशाचे पालन करावे़ अन्यथा कारवाईचा इशारा दिलेला आहे़
पिंपळनेरला तीन दिवसांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:22 IST