शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेत स्थायी आणि महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:53 IST

विशेष महासभा : २७ नगरसेवकांची सभेकडे पाठ

ठळक मुद्देमनपा स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवडमहिला बालकल्याण समितीसाठी ११ सदस्यांची निवड विशेष महासभेत २७ नगरसेवकांची सभेकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीसह महिला बालकल्याण समितीसाठी सर्व ११ सदस्यांची निवड गुरूवारी झालेल्या विशेष महासभेत करण्यात आली़ महापौर कल्पना महाले यांनी गटनेत्यांच्या शिफारशीनुसार नवीन सदस्यांची नावे जाहीर केली़ विशेष म्हणजे सदस्य निवडीच्या या महासभेला तब्बल २७ नगरसेवक अनुपस्थित होते़ मनपाच्या स्थायी समितीत १६ सदस्यांचा समावेश असून त्यापैकी निम्म्या अर्थात ८ सदस्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०१८ ला पूर्ण होत आहे़ तर महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ २२ जानेवारीला संपणार असल्याने समितीची फेररचना करण्यासाठी गुरूवारी विशेष महासभा झाली़ यावेळी महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर उमेर अन्सारी, नगरसचिव मनोज वाघ व सदस्य, अधिकारी उपस्थित होते़  राष्ट्रवादीचे गटनेते कमलेश देवरे, शिवसेनेचे गटनेते संजय गुजराथी, काँग्रेसच्या गटनेत्या मोमीन आतिया बानो आणि शहर विकास आघाडीच्या गटनेत्या माधुरी अजळकर यांनी स्थायी व महिला बालकल्याण समितीसाठी निवडलेल्या सदस्यांची यादी बंद पाकिटात नगरसचिवांकडे सादर केली होती़ महापौरांच्या आदेशानुसार बंद पाकिटे उघडून महापौर कल्पना महाले यांनी प्रथम स्थायी समितीच्या व त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली़ त्यानंतर नवनियुक्त सदस्यांचा महापौर, आयुक्त व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ स्थायी समितीचे नवीन सदस्यस्थायी समितीत राष्ट्रवादीतर्फे नलिनी वाडिले, कशीश उदासी, जितेंद्र शिरसाठ व जुलाहा नुरून्नीसा मकबुल अली यांची वर्णी लागली़ तर शहर विकास आघाडीतर्फे सुभाष खताळ, शेख फातमा शेख गुलाब यांची निवड झाली़ काँग्रेसतर्फे लिना करनकाळ यांना तर शिवसेनेतर्र्फे विश्वनाथ खरात यांना स्थायी समिती सदस्य पद देण्यात आले़ महिला बालकल्याण समितीच्या नवनियुक्त सदस्य महिला व बालकल्याण समितीत  राष्ट्रवादीतर्फे शशिकला नवले, नलिनी वाडिले, चंद्रकला जाधव, ललिता आघाव, जैबुन्नीसा पठाण व यमुनाबाई जाधव यांना, शहर विकास आघाडीतर्फे माधुरी अजळकर व चित्रा दुसाणे यांना, शिवसेनेतर्फे मुक्ता गवळी व हिराबाई ठाकरे यांना आणि काँग्रेसतर्फे मोमीन आतीयाबानो दोस्त महंमद यांना संधी देण्यात आली़ गेल्या वर्षी महिला बालकल्याण समितीतील सहा महिला सदस्यांची समितीवर फेरनिवड करण्यात आली होती, यंदा तशी संधी चंद्रकला जाधव, माधुरी अजळकर व मोमीन आतियाबानो दोस्त महंमद या तीन सदस्यांना मिळाली़ तर नलिनी वाडीले यांनी महिला बालकल्याण समिती सभापती पद आधी भुषविले आहे़ परंतु वाडीले यांना यंदा स्थायी समितीसह महिला बालकल्याण समितीतही स्थान मिळाले आहे़२७ नगरसेवकांची सभेकडे पाठस्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी झालेल्या विशेष महासभेकडे तब्बल २७ नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ स्थायी समितीतून निवृत्त होत असलेले बहूतांश सदस्यही गैरहजर होते़