शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘जलसंधारणा’त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:46 IST

बुराई नदी परिक्रमा : चौथ्या दिवशी बाभुळदे येथील कार्यक्रमात जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देचौथ्या दिवसअखेर ४८ कि.मी. अंतर पार दरखेडा येथील बंधा-याचे भूमिपूजन दोन वयोवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग, आज समारोप 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानासह जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. लोकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता बुराई नदी परिक्रमा बाभुळदे येथे पोहचली, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात केले. रविवारी सकाळी शिंदखेडा येथे या पाचदिवसीय बुराई नदी परिक्रमेचा समारोप होणार आहे. तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यात येणार आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून या नदीवर ठिकठिकाणी २४ बंधारे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री रावल यांनी गेल्या बुधवारपासूून साक्री तालुक्यातील दुसाणे येथून बुराई नदी परिक्रमेला सुरूवात केली आहे. या परिक्रमेचा शनिवारी चौथा दिवस होता. आज सकाळी चिमठाणे, ता.शिंदखेडा येथून परिक्रमेला सुरूवात झाली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास परिक्रमेचे बाभुळदे गावात आगमन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमास दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने आदी उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिमठाणे येथील पुतळ्याला अभिवादन करून राज्याचे रोहयो व पर्यटन जयकुमार रावल यांनी चिमठाणे गावापासून आपल्या बुराई परिक्रमेच्या चौथ्या दिवसाचा प्रारंभ केला.  दरखेडा बंधा-याचे भूमिपूजन बुराई नदीपात्रात दरखेडा येथे बांधण्यात येणाºया बंधा-याचे भूमिपूजन मंत्री रावल यांच्याहस्ते आज झाले. या वेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. बुराई नदी परिक्रमा आटोपल्यावर तापी-बुराई योजनेचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.चौथ्या दिवशी निशाणे, महाळपूर, बाभुळदे, अलाणे, चिरणे, कदाणे, परसामळ  या गावांमध्ये प्रबोधन करत रात्री उशीरा ही परिक्रमा कुमरेज, ता.शिंदखेडा येथील गायत्री धाम मंदिरात पोहचली. गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे ४८ कि.मी.चे अंतर पूर्ण झाले आहे. चौथ्या दिवशी बुराई नदी परिक्रमेचा मुक्काम कुमरेज, ता.शिंदखेडा येथ राहणार आहे. ही परिक्रमा पाचव्या दिवशी रविवारी सकाळी ७.३० वाजता कुमरेज येथून शिंदखेडा शहराकडे मार्गस्थ होईल. तेथून पुढे पाटण येथील बंधाºयाचे भूमिपूजन करून मंत्री जयकुमार रावल शिंदखेडा येथील गांधी चौकात होणा-या बुराई नदी परिक्रमा समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. गेल्या पाच दिवसांत साक्री व शिंदखेडा या दोन्ही तालुक्यांमध्ये बुराई संवर्धनासंदर्भात या उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. दोन वयोवृद्धांचा उत्स्फूर्त सहभागपरिक्रमेच्या चौथ्या दिवसाचे वैशिष्ट म्हणजे चिरणे-कदाणे येथील ९५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक गैंधल भोई व ८० वर्षीय लकडू पाटील या दोन्ही वृद्धांनी मंत्री रावल यांच्यासोबत परिक्रमेत ७ कि.मी. अंतरापर्यंत प्रवास करून बुराई नदी परिक्रमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या प्रतिसादामुळे आपणास ऊर्जा व आशीर्वाद मिळाले, अशी भावना मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.बुराई परिक्रमेत रोज अनेक संघटना सहभागी होत असून शुक्रवारी गांगेश्वर मंदिर ते चिमठाणेपर्यंत महिलाही सहभागी झाल्या. त्यात वैशाली मिलिंद महाजन, वैशाली प्रवीण महाजन, इंदिरा रावल, अलका राजपूत, यांच्यासह अनेक महिलांनीही सहभाग नोंदविला.  

 

टॅग्स :DhuleधुळेJaykumar Rawalजयकुमार रावल