शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धुळ्याची राजकीय व्यवस्था घाणेरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:01 IST

शांतता कमिटीची बैठक : महेश मिस्तरी यांची आमदारांवर टिका

ठळक मुद्देउत्सवाला गालबोट लागणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा डीजे मोठ्या आवाजात वाजवू नये. पोलीस प्रशासन व विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी एक खिडकी योजनेत नाव नोंदणी करून घ्यावी. उत्सव काळात मद्य प्राशन करून कुठल्याही चौकात धिंगाणा घालू नये, असे ऐकल्यास कडक शिक्षा केली जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडळांनी स्वत:च सीसीटीव्ही कॅमेरे आणून बसवावे, प्रशासनातर्फे पुरस्कार देताना त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. ४ कुठल्याही अफवा,संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू आढळून आल्यास तत्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. डीजे वाजविण्याबाबत ठरवून दिलेले नियमांची अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करावे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने २०० महिला पोलीस व होमगार्डची गणेशोत्सव काळात नियुक्ती करण्

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  शहरात गेल्या पाच वर्षात कर्तव्यदक्ष चार आयुक्त, चार पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकार  शहरातील घाणेरड्या  राजकीय व्यवस्थेमुळे घडले असून आपल्या शहराचे आमदारही बेजाबदार आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांना न घाबरता शासनाकडे त्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडावी, असे आक्रमक प्रतिपादन माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी यांनी येथे केले. गणेशोत्सव व बकरी ईदच्या निमित्ताने सोमवारी दुपारी नियोजन सभागृहात आयोजित शांतता कमिटीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, जि.प.चे. मुख्यकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन,  जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते, महापौर कल्पना महाले, गजानन पाठक, मौलाना शकील, माजी आमदार शरद पाटील, डॉ. संजय पाटील, प्रदीप कर्पे, सत्तार शहा, मीना बैसाणे, वाल्मीक दामोदर, रमेश श्रीखंडे, संजय पगारे आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. महेश मिस्तरी म्हणाले, की चांगल्या अधिकाºयांना शहरात टिकू दिले जात नाही. गोर, गरीबांचे ओटे, अतिक्रमण काढण्याचा घाट शहरात घातला जातोय. आता तर शहराच्या आमदारांनी कालिका मंदिर व त्या परिसरात असलेले पंचमुखी हनुमान मंदिर पाडण्यासाठीचे पत्र शासनाला दिले आहे. आमदाराच्या या कृतिमुळे जनता नाराज आहे. त्यांच्या मनात खदखद आहे. आमदारांच्या विरोधात पत्रकारांनी  भूमिका मांडली तर त्यांच्यावरही दडपशाडी केली जात असून काही पत्रकारांवर तर ते मोक्का लावण्याचे पत्र  देतात. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या विरोधात शासनाकडे भूमिका मांडावी, असे त्यांनी आक्रमकपणे सांगितले. 

गणेशोत्सवानंतर उपोषण करणार दलित ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे म्हणाले, की महापालिकेच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र पाडण्यापूर्वी शासनाने चर्चा करून हा विषय मार्गी लावावा, असे मनपा प्रशासनाला सूचित केले होते. परंतु, तसे न करता, कोणालाही विश्वासात न घेता हे अध्ययन केंद्र पाडण्यात आले आहे, याचा पाठीमागे कोण आहे? याची चांगलीच कल्पना असून आता गणेशोत्सव झाल्यानंतर याप्रश्नी उपोषण करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले. अध्ययन केंद्र पाडल्यामुळे दलित जनतेमध्ये  खदखद पसरली असून त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकतो, असेही ते म्हणाले.