शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासह स्वच्छतेकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:34 IST

आरोग्य शिबिर : उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरातील रहिवाशांनी आरोग्यासह स्वच्छतेकडे नीट लक्ष द्यायला हवे़ सर्वांची दृष्टी चांगली राहिली तर सर्वदृष्टीने कार्यक्षम राहणार. तसेच स्वच्छता अभियानातील उत्कृष्ट सहभागासाठी सर्वांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहील यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी केले.येथील इंद्रसिंग भाऊसाहेब राजपूत हॉलमध्ये आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन, तालुका युवक काँग्रेस व शंकरा आय हॉस्पीटल यांच्या वतीने ८१वे आरोग्य शिबिर तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले की, गरजूंसाठी व सर्वांसाठी कृत्रिम हातपाय बनविण्यासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करीत आहोत, याचा लाभ घेवून आपले जीवन आनंददायी व्यतीत करावे. आरोग्याची कोणतीही तक्रार राहू देणार नाही, यासाठी मुंबईच्या नामांकित हॉस्पीटलशी संपर्क केला आहे. लवकरच सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पीटलचे निर्माण करायचे आहे. विकास योजना अभियानाचाही लाभ सर्व गोरगरीब, गरजूंनी घ्यावा.यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन गिरासे, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, माजी नगरसेवक नाटुसिंग गिरासे, नेतेंद्र राजपूत, माजी नगराध्यक्षा संगिता देवरे, जि.प.सदस्या कल्पना राजपूत, नगरसेविका रंजनाताई सोनवणे, हेमलता गवळी, मल्हारराव चव्हाण, सभापती राजेंद्र अग्रवाल, मांडळचे भटू माळी, नगरसेवक हर्षल गिरासे, देवेंद्र राजपूत, अमोल पाटील, गणेश सावळे, चंद्रकांत कोळी, राजेंद्र पाटील, रावसाहेब पाटील, सुरेश अहिरे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.या शिबिरात ३२८ जणांची डोळे तपासणी करण्यात आली. ५० जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. अनेक जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक जयवंत पाडवी, सुत्रसंचालन के.आर. जोशी तर आभार बी.एन. अहिरे यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे