म्हसदी : काळगावातील ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेऊन पठाडी चिंच नाल्यावर लवकरच पुलाचे काम करण्यात येईल तसेच समाज मंदिरासह एकलव्य पुतळ्याचे सुशोभिकरण व गावासाठी जलशुद्धीकरण केंद्राचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार मंजुळा गावित यांनी केले. काळगाव (ता. साक्री) येथे लोकवर्गणी व लोकसहभागातून वीर एकलव्याच्या पुतळ्याचे अनावरण आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी होते तर पंचायत समिती सदस्य राजधर देसले, काळगावचे सरपंच संजय भामरे, उपसरपंच कैलास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब खैरनार, बापू गायकवाड, रावसाहेब ठाकरे, प्रतिभा ठाकरे, छाया सोनवणे, वत्सलाबाई सोनवणे, सुशीलाबाई ब्राह्मणे, धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, संचालक यशवंतराव देवरे, हिम्मतराव देवरे, म्हसदी येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन एम. एच. देवरे ,एकलव्य संघटनेचे अध्यक्ष नंदू सोनवणे, माजी उपसरपंच पठाण सोनवणे, पोलीसपाटील संघटनेचे माजी अध्यक्ष शांताराम देसले, फोफीरचे सरपंच रवींद्र पवार, बेहेडचे सरपंच वसंत तोरवणे, माजी सरपंच छोटू तोरवणे, नीलेश देसले, राजेंद्र भामरे, सोमनाथ तलवारे, नंदू शिंदे, राजेंद्र माळी, सचिन पवार, संजय माळी, अमोल माळी, साहेबराव अहिरे, सुरेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी काळगावचे सरपंच संजय भामरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आमदार गावित व जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी यांच्या हस्ते वीर एकलव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी यशवंत बोर्डे व गोकुळ परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. एकनाथ गायकवाड, साहेबराव गायकवाड, तानकू सोनवणे, सुखदेव सोनवणे, अभिमन सोनवणे, आबा सोनवणे, नानाभाऊ अहिरे, वसंत सोनवणे, गुलाब ठाकरे, विक्रम गायकवाड, दगडू सोनवणे, मोठाभाऊ सोनवणे, किसन अहिरे, भाऊसाहेब गायकवाड, अण्णा गायकवाड, धनसिंग सोनवणे, सुखदेव सोनवणे, हिरामण गायकवाड, लक्ष्मण सोनवणे, समाधान गायकवाड, आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन पोलीसपाटील प्रा. गणेश देसले व एम. एच. देवरे यांनी केले.