शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१९ व्या वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:47 IST

स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर  : कापडणे येथे शेतकºयांना संघटीत करून केला सत्याग्रह

सुनील साळुंखे । शिरपूर : देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी स्वातंत्र्य संग्रमात उडी घेतली. त्यापैकी एक असलेले शिरपूर तालुक्यातील विखरण येथील  स्वातंत्र्य सैनिक असलेले भिलाभाऊ लकडू कुंवर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी १९४२च्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींसमवेत सहभाग घेतला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर ९९ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर यांनी स्वातंत्र्य संग्रमातील आठवणींना उजाळा दिला. भिलाभाऊ कुंवर यांचा जन्म २५ मे १९२२ रोजी विखरण  येथे झाला़  १९३३ मध्ये कापडणे येथे शिक्षणासाठी गेले. कापडणे येथील ४२ शेतमजुरांना संघटीत करून त्यांच्यासह धुळे येथे सत्याग्रह केल्याने,  त्यांना एक दिवस व रात्रभर उपाशी ठेवून सोडून देण्यात आले़ पुन्हा अटक व्हावी म्हणून त्यांनी धुळे-देवभाने दरम्यान टेलिफोन खांबाची मोडतोड केली़ तारा तोडल्या, रस्त्यावर झाडांच्या फांद्या टाकून       रहदारीस अडथळा निर्माण केला़ एवढे करूनही त्यांना अटक झाली नाही़कापडणे येथे २ आॅक्टोंबर १९४२ला त्यांना अटक करण्यात आली़ सोनगीरच्या पोलिस कस्टडीत एक महिना ठेवले.  १४ नोंव्हेंबर १९४२ रोजी शिंदखेडा न्यायालयाने  आठ महिन्याची शिक्षा ठोठावली.  त्यांनतर त्यांना नाशिकच्या जेलमध्ये रवाना केले. या आठ महिन्याच्या तुरूंगवासाच्या काळात त्यांची धर्मपत्नी केशरबाई कुंवर यांनी आटापाटी व औंध संस्थानच्या राजीधानीच्या गावी धुळे जिल्ह्यातील व सातारा-सांगली जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांच्या भूमिगत सहकाºयांची जेवणाची काळजी घेतली़ दिवसा भाकरीच्या पाटीत शस्त्रास्त्रे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी पार पाडली़हैद्राबाद संस्थान विलीनीकरणावेळी सुलतान बाजारातील रघुनाथबाग चौकात जयप्रकाश नारायण आले असतांना सभा उधळून लावण्यासाठी निजाम सरकारने काशिम रजवी यांच्या आदेशान्वये पोलिसांनी लाठीमार केला़ त्या लाठीमारात ते गंभीर जखमी झाले. सन १९५६ ते १९७७ अशी तब्बल २१ वर्षे किसान विद्या प्रसारक संस्थेचे ते व्यवस्थापक होते़ १९७४ मध्ये स्व़इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपत्र व मानपत्र धुळे येथील जि़प़च्या सभागृहात तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते कुंवर यांना सुर्पूद करण्यात आले आहे़ सेवानिवृत्तीनंतर ते अध्यात्मिक वर्गाकडे वळलेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे