शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ११५ अभियंते सामूहिक रजा आंदोलनात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:43 IST

जिल्हा परिषद : ग्रामीण भागातील विकासात्मक कामे पडली ठप्प

ठळक मुद्देअभियंत्यांना अतांत्रिक कामे देऊ नका!नोंदणीकृत असलेल्या जिल्हा परिषद अभियंता संघटनेस शासनाने मान्यता द्यावी. जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना प्रवास भत्ता दरमहा दहा हजार रुपये द्यावा. तो ही मासिक वेतनासोबत मिळायला हवा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग तत्काळ निर्माण करावा. जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदांच्या प्रमाणात पुनर्विलोकित करावा.जिल्हा परिषदेतील कार्यरत अभियंत्यांना अतांत्रिक कामे देऊ नये.अभियंत्यांसाठी जीवनदायी आरोग्य विमा योजना लागू करावी. जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षेसाठी लागू केलेले २१ एप्रिल २००६ चे परिपत्रक रद्द करावे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन व शासनस्तरावर पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या पदाधिकाºयांनी आजपासून सामूहिक रजा आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील ११५ अभियंते सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे ग्रामीण भागात सुरू असलेली विकासात्मक कामे ठप्प पडली आहे. याबाबत संघटनेच्या प्रतिनिधींनी सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्याकडे निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर दिवसभर धरणे आंदोलन करीत निदर्शनेही केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पी. विसपुते, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत बेडसे, जिल्हा सचिव दिलीप पाटील, एन. डी. पाटील, विनयकुमार खैरनार स्वानंद पाटील, सुधीर शेवाळे, अभिमन्यू बिºहाडे, प्रकाश एन. पवार, जयदीप पाटील, उमेश चौधरी, राजेंद्र महाजन, जितेंद्र गवते, अमित शिंदे, भीमराव फुलपगारे, दिलीप पाटील, सुनील पाटील, महिला प्रतिनिधी जास्वंदी देवरे आदी उपस्थित होते. प्रशासनाची भूमिका सकारात्मक जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या प्रतिनिधींनी जि.प.चे सीईओ गंगाथरन देवराजन व जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांना निवेदन दिले. त्यावेळी प्रशासनाची भूमिका सकारात्मक होती. याबाबत संघटनेच्या मागण्या रास्त असून शासनस्तरावर पत्र पाठविण्यात येईल, असे आश्वासन संघटनेच्या प्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विसपुते यांनी दिली. आज ठरणार पुढील भूमिका दरम्यान, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे मंगळवारदेखील सामूहिक रजा आंदोलन सुरू राहणार आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रश्न न सुटल्यास राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या होणाºया बैठकीत आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. सामूहिक रजा आंदोलन राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये सुरू आहे. या आंदोलनामध्ये राज्यात ३२०० अभियंते सहभागी झाले आहेत. 

गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आमच्या संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता आम्ही आंदोलनाचे पाऊल उचलले आहे.      - ज्ञानेश्वर विसुपते, जिल्हाध्यक्ष,      जिल्हा परिषद अभियंता संघटना

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद