धुळे : येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता भरत रामदास बागुल (वय ४८, रा. मालेगाव) हे बुधवारी काम आटोपून मोटारसायकलने मालेगावी घराकडे जात होते. मालेगाव ते चाळीसगाव चौफुलीजवळ त्यांच्या दुचाकीला एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.धुळे पंचायत समितीत बांधकाम विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत असलेले भरत बागुल हे मालेगाव येथील रहिवासी असल्याने ते रोज ये-जा करायचे. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम आटोपल्यावर ते आपल्या मोटारसायकलने मालेगावकडे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुलीजवळ ट्रॅक्टर आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. गंभीर जखमी झाल्याने भरत बागुल यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त करण्यात आली.बागुल हे महानुभावी पंथी होते. त्यांची मुलगी अभियंत्यांचे शिक्षण घेत आहे. बागुल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता कळताच जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत हळहळ व्यक्त करण्यात आली.
पंचायत समितीचे शाखा अभियंता अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 22:06 IST