धुळे : जिल्ह्यातील रहिवासी असलेले काही नागरिक आंतरराष्ट्रीय परमिटदेखील काढतात. आंतरराष्ट्रीय परमिट काढण्यासाठी जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी तीन ते चार अर्ज येत असल्याची माहिती मिळत आहे. परदेशात गेल्यानंतर तेथेही वाहन चालवता यावे यासाठी परमिटचा उपयोग होतो. परिणामी परदेशामध्ये गाडी चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरणही करता येऊ शकते.
जिल्ह्यातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. काही नागरिक नोकरीनिमित्ताने परदेशात वास्तव्यास आहे. काही व्यवसायनिमित्ताने तर काही पर्यटनासाठी परदेशात जात असतात. काही नागरिक हे त्या ठिकाणी वाहन चालविण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय परमिट मिळणे आवश्यक असते. त्यासाठी आरटीओ विभागात अर्ज करावा लागतो. यावर्षी धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीने आंतरराष्ट्रीय परमिट मिळावे, यासाठी अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ऑनलाइन पध्दतीनेसुध्दा अर्ज करता येतो.
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना
- आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा आपण उपयोग करू शकतो. त्यासाठी आपले अधिकृत कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परमिट हे केवळ एका वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येत असते.
- आंतरराष्ट्रीय परमिट मिळविण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट यावरील घराचा पत्ता हा एकच असायला हवा.
- परमिटची मुदत संपली आणि तुम्ही परदेशात असाल तर तेथील परराष्ट्र मंत्रालयात अर्ज करावा लागतो. ऑनलाइन कागदपत्रे द्यावे लागतात.
कोण काढतो हा परवाना ?
- आंतरराष्ट्रीय परवाना काढण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट असणे आवश्यक आहे. हा परवाना मिळविण्यासाठी संबंधित व्यक्ती स्वत: हजर लागते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षात परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. ज्यांचे व्यावसायिक काम आहे अथवा ज्यांना पर्यटन करताना वाहन चालवायचे असेल असे नागरिक परमिट काढण्यासाठी इच्छुक असतात.
भारताचा अन्य देशांशी करार
- आंतरराष्ट्रीय परमिट हे एका वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येत असते. नंतर त्याचे नूतनीकरण करण्यात येते. आंतरराष्ट्रीय परमिटसाठी भारताचा ६२ देशांशी करार झाला आहे. त्या देशांमध्ये या परमिटचा उपयोग होतो. यंदा ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ एकाने आंतरराष्ट्रीय परमिटसाठी अर्ज केला आहे.
आकडेवारी
२०१८ : ०३
२०१९ : ०२
२०२० : ०२
२०२१ : ०१