लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील धोकादायक इमारती यंदाही दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत धोकादायक इमारतींबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे वादळी वाºयासह पाऊस झाल्यास धोकादायक इमारती कोसळून जिवीतहानी होऊ शकते. महापालिकेने गेल्या वर्षी शहरातील धोकेदायक इमारतींचे सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालिन इमारती आहेत़ त्यापैकी बहूतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ त्यापैकी बहूतांश धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचा रहिवास आहे. त्यामुळे पावसाळयात वादळी वारे व मुसळधार पाऊस झाल्यास धोकादायक इमारती कोसळल्यास वित्त व जिवीतहानी देखील होऊ शकते़ धोकादायक इमारतींना मनपाकडून दरवर्षी अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४ (१) नुसार नोटीसा बजाविणे क्रमप्राप्त आहे. या नोटीसा मिळाल्यानंतर धोकादायक इमारतीच्या मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते महापालिकेला सादर केले पाहिजे. त्यावर मनपाकडून पुढील कार्यवाही केली जाऊ शकते. परंतु एकाही इमारतधारकाने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करून अहवाल मनपाला सादर केलेला नाही. दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटीसा बजाविण्याची ‘फॉरमॅलिटी’ मनपाकडून पार पाडली जाते़ परंतु यंदा नोटीसाही बजाविण्यात आलेल्या नाही़
धुळयातील १०५ धोकादायक इमारती दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:25 IST
मनपाचा कानाडोळा, पावसाळयात होऊ शकते जिवीतहानी
धुळयातील १०५ धोकादायक इमारती दुर्लक्षित
ठळक मुद्दे- शंभरवर्षापेक्षा जुन्या इमारती धोकादायक स्थितीत- पावसाळयात होऊ शकते जिवीत व वित्तहानी- धोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्याचा मनपाला विसर