शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 21:49 IST

जिल्हा परिषद : यंदापासून ग्रा. पं. पातळीवर उत्कृष्ट प्रभाग स्पर्धा

ठळक मुद्देउत्कृष्ट प्रभाग स्पर्धा ही गाव, जिल्हा परिषदस्तरावर गट स्पर्धा, जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर घेतली जाणार आहे. त्यात गाव पातळीवर होणाºया स्पर्धेत प्रथम ग्रामपंचायतीला दहा हजार रुपये. जिल्हा परिषदेच्या गट स्पर्धेत प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ५० हजार रुपये, जिल्हास्तरीय स्पर्धेत : प्रथम- पाच लाख, द्वितीय- तीन लाख व तृतीय- २ लाखाचे बक्षीस दिले जाईल.विभागीय स्पर्धा : प्रथम- १० लाख, द्वितीय- ८ लाख व तृतीय- ६ लाख, राज्यस्तरीय स्पर्धा : प्रथम २५ लाख, द्वितीय- २० लाख व तृतीय- १५ लाख रुपये दिले जाईल. तसेच महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्रथम १ कोटी, द्वितीय- ७५ लाख व तृतीय- ५० लाख, महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती पुरस्कार : प्रथम- ५० लाख द्वितीय- ३० लाख व तृतीय २० लाखाचे पारितोषिक संबंधित ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला  आदेश दिले आहे. तसेच या अभियानाबाबात सुधारित मार्गदर्शक सूचनाही कळविल्या आहेत. तसेच यंदापासून ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात येणाºया ‘उत्कृष्ट प्रभाग स्पर्धा’ याविषयी नियमावली प्रशासनाला कळविण्यात आली असून त्यादृष्टीने  जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे.शासनाकडून संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व ते ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांपर्यंत कसे पोहचले? यासाठी शासनाने  जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला देण्यात आले आहेत. या अभियानासाठी राज्यस्तरावरील उच्चाधिकार समितीत प्रमुख दहा विभागाचे सचिव, प्रधान सचिव हे सदस्य असणार आहे. तर जिल्हा पातळीवर सनियंत्रण समिती नियुक्त केली जाईल. त्याचे अध्यक्ष हे पालकमंत्री तर सचिव जिल्हा परिषद अध्यक्ष असतील. तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख अधिकाºयांचादेखील त्यात समावेश राहणार आहे. ग्रामसभा घेण्याचे निर्देश संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाची सुरुवात १ मेपासून होईल. त्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. याउद्देशाने १६ ते ३१ मे या काळात ग्रामसभा भरविण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ग्रामसभेत योजनेबद्दल माहिती देऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे सूचित करण्यात आले आहे.   पुढीलवर्षी फेब्रुवारी २०१९ मध्ये सहभागी गावाची पाहणी करून बक्षीस पात्र गावांची निवड केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे