लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यात शिरपूर पॅटर्नसोबत परिसरातील शेतकºयांना रोजगार मिळवून देण्यासाठी या बंधाºयांमध्ये मत्सबीज टाकले, आता तर बंधाºयांच्या काठावर फळ वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे़ जेणेकरून त्या भागातील शेतकºयांना रोजगार निर्मितीसाठी पुढे करण्याचा प्रयत्न केला जात आहे़माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासह उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचवावे म्हणून सन २००३ पासून शिरपूर पॅटर्नचे काम हाती घेतले आहे़ या १७ वर्षात तब्बल २५० पेक्षा अधिक बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवून जिरविले जात आहे़ त्यामुळे बंधारालगत असलेल्या शेतकºयांच्या खोल गेलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळीत भर पडली आहे़ किंबहुना बहुतांशी शेतकरी या बंधाºयाच्या पाण्यामुळे बारमाही पिके घेवू लागले आहेत़गेल्या महिन्यात रोहिणी-भोईटी परिसरातील शिरपूर पॅटर्नच्या बंधारे ओव्हर फ्लो झाल्यामुळे मत्स्यबीज टाकण्यात आले आहे़ या बंधाºयात मत्सबीज टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिसरातील आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध करून त्यांचे आर्थिक जीवनमान बदलणे तसेच आरोग्यदायी पोष्टिक आहार निर्माण करणे या हेतूने टाकण्यात आलेत़ कार्प मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मुख्य आधार आहे़ तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) व कोंबडा (स्कॉर्पीयन फिश) हे बीज बंधाºयात सोडण्यात आले.येत्या १७ रोजी उद्योगपती तपनभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर पॅटर्नच्या बंधाºयावर आता भावनगरी जातीचे सिताफळ वृक्षाची लागवड केली जाणार आहे़ जेणेकरून तेथील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्वखर्चाने ही महागडी रोपे आणली आहेत़
बंधाऱ्यावर आता फळबाग आणि मत्स्य योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:15 IST