शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:37 IST

अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश

आॅनलाइन लोकमतधुळे : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका यांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन थकले होते. मात्र हे थकीत मानधन तसेच वाढीव थकबाकी तातडीने मिळणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.बालकांना सदृढ आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी ग्रामीण भागात बालकांना लहानपणापासूनच अंगणवाडीत दाखल केले जाते. अंगणवाडीमध्ये महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार व कुपोषण या अन्य बाबीकडे लक्ष पुरविणे अशा कार्याचा समावेश अंगणवाडीमध्ये होत असतो. शिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. ग्रामीण अथवा दुर्गम भागातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडीतूनच होत असतो.धुळे जिल्ह्यात २,१०४ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची व मदतनीसांची प्रत्येकी १९१३ पदे मंजूर आहेत. तर मिनी अंगणवाडी सेविकांची १९१ पदे मंजूर आहेत. अंगणवाडीसेविकांना आठहजार, मिनीसेविकांना ५ हजार ७५० तर मदतनीसांना ४ हजार २५० रूपये मानधन मिळत असते.राज्यातील सर्व अंगणवाडीसेविकांचे नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या तीन महिन्यांचे मानधन थकले आहे.यासंदर्भात महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात भेट घेतली.यात नोव्हेंबर २०१९ पासूनचे थकीत मानधन आणि आॅक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीतील मानधनवाढीची थकीत रकमेचा मंजूर झालेला निधी विनाविलंब वितरीत करून त्वरित मानधन देण्यात यावे अशी मागणी केली.थकीत मानधनाची रक्कम येत्या आठवड्याभरात बॅँक खात्यात जमा करण्यात येईल. मानधनवाढीची थकीत रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. थकबाकीची रक्कमही त्वरित अदा केली जाईल असे सांगण्यात आले. तसेच दहमहा पाच तारखेला मानधन मिळण्यासाठी वित्त व नियोजन विभागाशी चर्चा करण्यात आली असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल असे यशोमती ठाकूर यांनी शिष्टमंडळास सांगितले.या शिष्टमंडळात माया परमेश्वर, रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांचा समावेश होता.दरम्यान थकीत मानधन मिळणार असल्याने अंगणवाडीसेविका, मदतनीस यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे