शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ‘मुल्यमापन’चे आॅनलाईन गुणांकन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 20:25 IST

पेपर तपासून आॅफलाईन गुण दिले, शिक्षकांचा आॅनलाईन कामावर बहिष्काराचा परिणाम

ठळक मुद्देशिक्षण विभागातर्फे ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान झाली परीक्षाशिक्षकांनी पेपर तपासून आॅफलाईन गुणांकन केलेआॅनलाईन कामावर बहिष्कार असल्याने, गुण भरण्याचे काम रखडले

आॅनलाईन लोकमतधुळे : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती पडताळण्यासाठी पायाभूत  व संकलित चाचण्या शिक्षण विभागाकडून नुकत्याच घेण्यात आल्या.  परंतु जि.प.च्या प्राथमिक शिक्षकांचा आॅनलाईन कामावर बहिष्कार असल्याने मुल्यमापन चाचणीचे आॅनलाईन गुण भरण्याची प्रक्रिया रखडल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षण विभागातर्फे ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान पायाभूत व संकलित चाचणी घेतली. इयत्ता पहिली व दुसरीसाठी मराठी गणित, तिसरी ते पाचवीसाठी मराठी, गणित व इंग्रजी, तसेच सहावी ते आठवीसाठी मराठी, इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाची ही चाचणी होती. पहिल्या सत्रातील ही दुसरी चाचणी होती. यात ३० गुणांची लेखी व दहा गुणांची तोंडी अशी एकूण ४० गुणाची चाचणी होती. मुल्यमापन चाचणी सुरळीत पार पडली. शिक्षकांनी पेपर तपासून गुणही दिलेले आहेत. मात्र शिक्षकांनी गेल्या सप्टेंबरपासूनच २३ प्रकारच्या विविध आॅनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकलेला असल्याने, या मुल्यमापन चाचणीचे आॅनलाईन गुणच भरण्यात आलेली नसल्याची माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयाने दिली.दरम्यान गुण भरलेले नसल्याने, शासनाला  याची माहिती मिळू शकणार नाही.शाळा सिद्धी अंतर्गतच हा कार्यक्रम आहे. गुणांकन नसल्याने, कोणती शाळा कोणत्या ‘ग्रेड’मध्ये आहे, ते समजण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान ‘ए’श्रेणीत येणाºया शाळेलाच चटोपाध्याय, व निवड श्रेणी लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.आॅफलाईनला परवानगी द्यावी : पाटीलआॅनलाईन कामकाज बंद असल्याने, शासनाने शिक्षकांना आॅफलाईन माहिती भरायला परवानगी दिली पाहिजे. मात्र त्याकडेसुद्धा संबंधित विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याची प्रतिक्रीया  शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.ं