शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील ३० टक्के ग्राहकांनी भरले आॅनलाइन बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:16 IST

जून महिन्यात ९ कोटी ८४ लाखांचा केला भरणा, आॅनलाइन वीज बिल भरण्याकडे कल वाढला

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात ४ लाख २२ हजार ग्राहकयापैकी १ लाख २० हजार ग्राहकांनी आॅनलाइन वीजबिल भरले९ कोटी ८४ लाखांचा महसूल जमा

आॅनलाइन लोकमतधुळे : सर्वच क्षेत्रात आता पेपरलेस कारभाराकडे वाटचाल सुरू असून, त्याला आता महावितरणही अपवाद राहिलेले नाही. महावितरणनेही ग्राहकांना वीजबिल आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकाही याचा वापर आता करू लागले असून, गेल्या जून महिन्यात जिल्ह्यातील ३०.३५ टक्के ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला. यातून ९ कोटी ८४ लाख ५१ हजाराचा महसूल महावितरणच्या खात्यात जमा झाल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश पौनिकर यांनी दिली आहे.वीज बिल आली की ते भरण्यासाठी महावितरणच्या अथवा ज्या-ज्या ठिकाणी बिल भरण्याची सुविधा आहे, तेथे प्रचंड गर्दी होत असते. बील भरण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागायचे.परंतु स्मार्टफोनमुळे ग्राहकांना घरबसल्या वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचा वापर करून वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून वीज बिल भरता येऊ लागले आहे.मोबाईल अ‍ॅपवरून वीज बिलाचा सहज भरणा करता येत असल्याने, अनेकजण आता त्याचाच वापर करू लागले आहे. वीज बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्यापेक्षे घरबसल्या अगदी इंटरनेट मोबाईलसह इतर अनेक सुविधांद्वारे वीज बिल भरून लाभ घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय.धुळे जिल्ह्यात वीज वितरणची ग्राहक संख्या ४ लाख २२ हजार ६०९ एवढी आहे. यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. जून २०१९ मध्ये जिल्ह्यातील ३०. ३५ टक्के ग्राहकांनी म्हणजे जवळपास १ लाख २० हजार वीज ग्राहकांनी आॅनलाइनद्वारे वीज बिल भरणार केला. त्यातून महावितरणच्या खात्यात तब्बल ९ कोटी ८४ लाखांचा महसूल जमा झालेला आहे.ग्राहकांचा वाढता प्रतिसादआता मीटर रिडींग घेतल्यानंतर किती रिडंीग वीज वापरली आहे याचा मेसेज संबंधित ग्राहकांच्या मोबाईलवर येतो. त्यानंतर काही दिवसांनी वीज बिलही मोबाईलवर येते. आता महावितरणही बील देण्याची पद्धत हळूहळू बंद करीत आहे.येत्या काही महिन्यांमध्ये महावितरणचा कारभारही पेपरलेस झालेला दिसून येईल. त्यामुळे वीज बिल भरणा केंद्रावरही काही महिन्यांनी शुकशुकाट दिसून येईल. दरम्यान वीज बिल नियमित आले पाहिजे अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे