शिरपूर : क्षुल्लक कारणावरुन एकावर दगड, चाकू आणि कुºहाडीचा दांडा याचा वापर करत मारहाण करण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ ही घटना शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा गावात २२ मे रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली़याप्रकरणी मोतीराम गमऱ्या पावरा (४०) याने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, आमच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली म्हणून वाद घालत दहा ते बारा जणांनी एकाला जबर मारहाण केली़ यात धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ या हाणामारीत चार जणांना दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़याप्रकरणी सुनील हमसिंग पावरा, ईश्वर रामसिंग पावरा, चंपालाल शंकरलाल पावरा, प्रेमसिंग गोपीचंद पावरा, देवराम दिनेश पावरा, सागर प्रेमसिंग पावरा, कैलास गोपीचंद पावरा, रामेश्वर गोपीचंद पावरा, दिनेश गोपीचंद पावरा, काशिराम सजन पावरा, योेगेश कमलसिंग पावरा, रामप्रसाद गंगाराम पावरा (सर्व रा़ जामण्यापाडा ता़ शिरपूर) या संशयितांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात संबंधित १२ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
जामण्यापाड्यात एकावर चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:05 IST