फागणे येथील शुभम जितेंद्र साळुंखे वय १९, नितीन छोटू धनगर वय १९ व शिवाजी सुखदेव पाटील वय २७ हे तिघे मित्र ७ रोजी सायंकाळी पाच वाजता काही कामानिमित्ताने चारचाकी वाहन क्रमांक MH -04 -BK -6494 या वाहनाने अमळनेर येथे काही कामानिमित्ताने जात होते. शुभम साळुंखे हा ड्रायव्हिंग करत होता. वाहन एवढे भरधाव वेगाने जात असताना नवलनगरच्या पुढे शुभमच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटला. गाडीने जागीच दोन पलट्या खाल्ल्या. त्यात शुभम साळुंखे हा जागीच ठार झाला. तर त्याचे अन्य दोघं साथीदार गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.
शुभम साळुंखे हा घरातील एकुलता एक होता. तो अवघा बारा महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याची संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी आईवर आली होती. अनेक संकटांना तोंड देत आईने शुभमला मोठे केले होते. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. दि. ७ रोजी सायंकाळी त्याच्या मित्रानी पार्टी ठेवली होती. त्यात शुभमही जाणार होता; परंतु त्याचे अचानक काहीतरी अर्जंट काम निघाल्याने शुभम व त्यांचे दोघे मित्र ते काम करण्यासाठी वाहनाने अमळनेर येथे जात असताना अपघात झाला. शेवटी त्याला काळानेच ओडून नेल्याचे बोलले जात होते. शुभम हा लहानपणापासूनच हुशार आणि चंचल होता. शिक्षणातही हुशार होता. त्याच्या उपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
080921\img-20210908-wa0054.jpg
फागणे येथील तरुणाचे अपघाती निधन