लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : येथील नवापूर रस्त्यावर फिरायला जात असलेल्या पादचाºयास समोरून येणाºया पिक अप वाहनाने जोरदार धडक दिल्याने नाना चौकातील रवींद्र चंद्रसिंग राजपूत (४८) हा तरूण जागीच ठार झाला तर रणजित दौलत राजपूत हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पिक अप वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रवींद्र राजपूत यांचे अपघातात निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघाताची घटना लॉन्स समोरच्या राज्य मार्गावर शनिवारी रात्री पावणे दहा वाजेच्या घडली़ रात्री रोजच्या प्रमाणे रवींद्र राजपूत हे जेवणानंतर आपल्या घराजवळच्या मित्रांसह फिरायला निघाले. घरापासून नदी ओलांडून नवापूर रस्त्यावरून पायी पायी चालत असतांना पाठीमागून भरधाव वेगाने एमएच ०४ ईबी ७७६८ या क्रमांकाचे पीकअप वाहन सरळ पायी चालणा-याच्या दिशेने येत असल्याने काही क्षणातच रवींद्र राजपूत व रणजित राजपूत यांना धडक बसली़ यात रवींद्र राजपूत हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी राजपूत यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ तो पर्यंत रवींद्र यांची प्राणज्योत मावळली होती़ तर जखमी रणजित राजपूत यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ रवींद्र राजपूत यांचे शवविच्छेदन करण्यात आले़ त्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अवैध वाहतुकीवर संतप्त प्रतिक्रिया देत पोलिसांविषयी राग व्यक्त केला़ तरी अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे़ अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती़ जखमी झालेल्या रविंद्र यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही़ हळहळ व्यक्त होत आहे़
वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:40 IST