शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची धडक एकाचा मृत्यू, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 11:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना मालेगाव रोडवर धुळ्यानजिक घडली. तर सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणाची नोंद मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली.मध्यप्रदेश राज्यातील रतलाम जिल्ह्यातील मलवासा तालुक्यातील नायन येथे राहणारे रोहित राध्येश्याम नायक आणि बबलू गोपाल बंजारा हे दोघे दुचाकीने धुळेमार्गे कोपरगाव येथे जात होते. धुळ्यानजिक मालेगाव रोडवरील हॉटेल सिटीपॉईंटजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात रोहित नायक आणि बबलू बंजारा या दोघांना गंभीर दुखापत झाली. हाता-पायासह डोक्याला लागल्याने त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच रोहित नायक याचा मृत्यू झाला. तर, बबलू बंजारा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक उपचार केल्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्यात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बबलू बंजारा यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ यासह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दराडे करीत आहेत.