धुळे : शहरातील स्वामिनारायण मंदिरात सोमवारी सायंकाळी सारंगपूर येथून दीडशे संतांचे आगमन झाले आहे़ आज मंगळवारी सकाळी तालुक्यातील जामी, वरखेडीसह अन्य गावातील भाविकांची चर्चा करणार आहे़सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता संतांचे स्वामी नारायण मंदिरात आगमन आले़ पूजा व आरती झाल्यानंतर आज संत खान्देशात असलेल्या प्रासातिक ठिकाणांचे दर्शन घेण्यासाठी वरखेडी, मोहाडी, जापी, सोनगीर, धनूर, अमळनेर, चोपडा, कुसुंबा या ठिकाणी जावुन भेट घेणार आहे़ रात्री ९ ते १०.३० वाजेपर्यंत स्वामीनारायण मंदिरात सत्संग सभा आयोजित केली आहे़या संतांमध्ये ४० संत कुटुंबातील एकमेव अपत्य होते. अमेरिकेतून साधू होण्यासाठी आलेल्या वीस संतांचाही पथकात समावेश असल्याची माहिती प्रमुखांनी दिली़
राज्यभरातून दीडशे संत धुळ्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:49 IST