शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘एकच पर्व, बहुजन सर्व’!

By admin | Updated: January 18, 2017 23:40 IST

वामन मेश्राम : बहुजन क्रांती मोर्चाप्रसंगी परिवर्तनाचा नारा, जिल्हाधिका:यांना निवेदन

धुळे : केवळ मोर्चे काढून काहीच साध्य होत नाही तर मोर्चातून परिवर्तन व्हायला हव़े राज्यभरात निघालेल्या बहुजन मुक्ती मोर्चामुळे मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र ओबीसी मंत्रालय उभारण्याची घोषणा करावी लागली हे बहुजन मुक्ती मोर्चाचे यश असल्याची स्पष्टोक्ती भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिली़ यावेळी उपस्थित समर्थक कार्यकत्र्यानी ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.  येथील बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीतर्फे बुधवारी सकाळी 10 वाजता बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत़े त्या वेळी जाहीर सभेत मेश्राम बोलत होत़ेमान्यवरांचे मार्गदर्शनधुळे जिल्हा कारागृहासमोर झालेल्या या सभेला क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक मनोज महाले, जिल्हा संयोजक महादेव जमदाडे, ज्येष्ठ नेते एम़जी़ धिवरे, जुबेर शेख, हारुण अन्सारी, भाऊसाहेब सोनवणे, वसंत गुंजाळ (राष्ट्रीय उपाध्यक्ष, वडार समाज), संजय कुसळकर, तानाजी तडवी (आदिवासी कार्यकर्ते), नामदेव येळवे (कोळी समाज), रावसाहेब पाटील (माजी सरपंच, बेटावद), अॅड़ संतोष जाधव, विजय सोनवणे, आनंद शिंदे (राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ), गोपाल माने, अजहर हुसैन (जमात-ए-इस्लामी), राजेंद्र पाटील, साहेबराव गोसावी (भटके विमुक्त समाज) यांच्यासह विविध मान्यवरांनी मोर्चाला उपस्थित नागरिकांना संबोधित करीत समाज जनजागृतीसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे उद्देश व ध्येयधोरणांविषयी माहिती दिली, तसेच सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडल़े ङोंडे, घोषणांचे फलकमोर्चात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आयोजकांकडून टोप्या, ङोंडे व मागण्यांचे फलक वितरित करण्यात आल़े पिवळे, लाल, हिरवे व निळे ङोंडे  होत़े फलकांवर ‘महिलांवरील अत्याचार थांबवा’, ‘उठ बहुजना जागा हो, संघर्षाचा धागा हो’, ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ या घोषणा होत्या.राज्य सरकारचे हे षड्यंत्रवामन मेश्राम या वेळी म्हणाले की, राज्य सरकारने मराठा व दलित समाजात फूट पाडण्यासाठी त्यांच्या मोर्चाना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला़ संघ परिवाराने यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ त्यामुळेच बहुजनांचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला़ हा मोर्चा मराठय़ांविरुद्ध नसून परिवर्तनासाठी आह़े 108 वर्षाच्या संघर्षानंतर बहुजन समाजाला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले असताना मूकमोर्चे काढून आपण आपल्याच महापुरुषांचा अवमान करीत आहोत, असे मेश्राम म्हणाल़े मराठा व ओबीसींमध्येदेखील फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला़ इंग्रजांनी दोन धर्मात फूट पाडली, मात्र मुख्यमंत्री प्रत्येक जातीत फूट पाडत असल्याची टीका मेश्राम यांनी केली़जिल्हाधिका:यांना निवेदनदरम्यान, सभा सुरू असताना शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल़े शिष्टमंडळात प्रा़महादेव जमदाडे, कस्तुराबाई भिल, ईश्वर निहाळे, निर्मला निहाळे, छाया पाटील, गुरफान शेख, कैलास माळी, अण्णा बोरकर व जगदीशराजे शिंदे यांचा समावेश होता़ त्यातील काही नागरिक विविध घटनांतील पीडितांचे नातेवाईक होत़े दरम्यान, जाहीर सभेत एका महिलेनेही व्यासपीठावर येऊन भूमिका मांडली़