जवखेडा ता.शिरपुर : येथील गुलाब लोटन पाटील वय 55 घराचे छत कोसळून दबल्याने मृत्यु झाला.गेल्या दोन तीन दिवसापासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस पडत असल्याने काल शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे घरात एकटे झोपले असताना, पहाटे चार वाजता घराचे छत पडून छता खाली दबल्याने जागीच मृत्यू झाला. घरी एकटे असल्याने गावकऱ्यांना हि घटना उशिरा समजल्याने मदत कार्य होऊ शकले नाही.सदर जागेचा पंचनामा महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी .निबाळकर व मंडळ अधिकारी पी.पी.ढोले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तसा अहवाल तहसीलदार शिरपूर यांना सादर केला आहे. तरी पिढित कुंटुबाला मदत मिळावी अशी मागणी केली होती सदर मयताची पत्नीआजारी असल्याने नाशिक येथे दवाखान्यात आहे.त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा दोन मुली असा परीवार आहे.,
जवखेडा: मुसळधार पावसामुळे घराचे छत पडुन एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:25 IST