शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

परराज्यातून येणारा एक कोटीचा मुद्देमाल शिरपूरला हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:07 IST

कंटेनरचालकास अटक : ८५ लाख ५३ हजार २०० रुपये किंमतीचे १८० तंबाखूजन्य पदार्थांचे खोके जप्त

शिरपूर : राज्यात पर राज्यातून अवैध सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीसांनर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी कारवाई करुन लाखो रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व कंटेनरसह एकूण १ कोटी ५ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले़ शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यातील शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ राज्यासह बाहेरील राज्यातून अवैध सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची एका कंटेनर मधून तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीवरून शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई-आग्रा महामार्गावरील शहादा फाट्यावर पोलिसांनी सापळा रचला. रात्री ११ वाजेच्या सुमारास आरजे ५२ जीआर ३९६१ या क्रमांकाचा कंटेनर येताच त्याला थांबवून चौकशी करण्यात आली़ चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली़ परिणामी पोलिसांना संशय बळावला़ तसेच त्या चालकाला कंटेनर मधील मालाची योग्य ती माहिती देता येत नसल्याने सदर कंटेनर संशयावरुन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. तपासणी करतांना कंटेनरमध्ये इतर मालाच्या आडोशाला सुगंधीत तंबाखूजन्य व गुटकाजन्य पदार्थाची १८० खोके आढळून आली. सदर मालाची किंमत ८५ लाख ५३ हजार २०० रुपयांचा असून कंटेनर सहित १ कोटी ५ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाला कळविण्यात आले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कंटेनर वरील चालक रमजान नसरुद्दीन (रा़ नसरु ता़ डुंगरपूर जि़ पलवल, हरियाणा) यास संशयावरुन अटक करण्यात आली आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण बा-र्हे, सपकाळ, मोरे, सनी सरदार, संदीप रोकडे आदींनी केली. दरम्यान, हा मुद्देमाल कोठून येत होता, कुठे घेऊन जाणार होता, याची माहिती पोलीस घेत आहेत़ सापळा यशस्वीकंटनेरमधून तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी सापळा लावला आणि तो यशस्वी करुन दाखविला़
टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी