शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टची रात्र अखेरची, शंभर फूट खड्ड्यात कार पडून दोघे ठार

By देवेंद्र पाठक | Updated: January 1, 2024 19:18 IST

शिरपुरात नववर्षाच्या आनंदावर पडले विरजण, मध्यरात्रीची घटना.

शिरपूर : नववर्षाचा पहिलाच दिवस शिरपूरकरांसाठी वाईट बातमी घेऊन आला. शिरपूर विमानतळानजीक भरधाव कार खड्ड्यात उतरल्याने गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. प्रवीण शिवाजी पाटील (वय ४२) आणि प्रशांत राजेंद्र भदाणे (वय ३५) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रात्रभर दोघेही गंभीर अवस्थेत पडून होते. परिणामी त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब उजेडात आली. शिरपूर येथील क्रांतीनगरात राहणारे प्रवीण शिवाजी पाटील (वय ४२) आणि शिरपूर येथील मातोश्री कॉलनीत राहणारे बांधकाम व्यावसायिक प्रशांत राजेंद्र भदाणे (वय ३५) हे दोघे चारचाकी वाहनाने शिरपूर चोपडा रस्त्यावरून जात होते. शिरपूर विमानतळ रस्त्यावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असणारी कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. सुमारे १०० फूट असलेल्या या खोल खड्ड्यात काटेरी झुडपांचे प्रमाण अधिक आहे. कार कोसळताच दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचविण्यासाठी कोणीही येऊ शकले नाही.

सोमवारी सकाळी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना सदर अपघाती वाहन दिसल्याने ही घटना उघडकीस आली. लोकांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता दोघेही गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत काटेरी झाडाझुडपांमधून वाट काढत दोघा मृतांना कारच्या बाहेर काढण्यात आले. शिरपूर कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले.अपघातात मृत झालेले प्रवीण पाटील यांचे शहरातील इंदिरा हॉस्पिटलजवळ कॅफेचे दुकान आहे. ते राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क खूप हाेता. तर, प्रशांत भदाणे हे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत हाेते. दोघेही शिरपूरवासीयांना परिचित होते. त्यांच्या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात