शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

नॉन कोविड नगरपालिकेच्या रुग्णालयात दर महिन्याला होते २ लाखांची बचत,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

शिरपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासते आहे; पण शिरपूर नगरपालिकेचे रुग्णालय आहे ते स्वत: हवेतून ...

शिरपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासते आहे; पण शिरपूर नगरपालिकेचे रुग्णालय आहे ते स्वत: हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करते. नॉन कोविड रुग्णालय असले तरी दर महिन्याला या प्रकल्पामुळे २ लाखांची बचत होते. खान्देशातील एकमेव हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे रुग्णालय असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा आर. सी. पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेल्या या रुग्णालयात १०० बेड असून हे हॉस्पिटल मल्टीस्पेशालिस्ट आहे़ सुरुवातीला या रुग्णालयात आंतररुग्ण विभागासाठी लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा एजन्सीमार्फत होत होता, मात्र गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे २४ तास ऑक्सिजनची गरज पडू लागली. त्यामुळे सन २०१२ मध्ये तत्कालीन उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी व नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण यांनी माजी मंत्री व आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई यांच्या मार्गदर्शनाखाली १२ लाख खर्चाचा हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला़

औरंगाबाद येथील कंपनीकडून अमेरिकन एअर सेप यांच्या ऑक्सिजन जनरेशन सिस्टीम खरेदी केली. परंतु त्यानंतर दररोज रुग्णालयात अ‍ॅडमिट होणारे गंभीर बालरुग्ण व आयसीयूमधील रुग्णांची संख्या पाहता सन २०१६ मध्ये पुन्हा नवीन दररोज १९ ते २० मोठे सिलिंडर ऑक्सिजन पुरेल इतके क्षमतेची जनरेशन सिस्टीम बसविण्यात आली. त्यामुळे रुग्णालयातील प्रसूती कक्षात २, पीआयसीयू ७, एनआयसीयू ७, ऑपरेशन थिएटर्स ४, पेडियाट्रिक जनरल वाॅर्ड ४, आयसीयू अ‍ॅण्ड सर्जिकल आयसीयू ७, डायलेसीस २, कॅज्युअ‍ॅलिटी २ असे एकूण ३५ पॉईटस्द्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरविला जात आहे.

सुरुवातीला हा प्लान्ट उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागली. मात्र त्यानंतर या प्लांटचा मोठा फायदा झाला. कोरोनामुळे आता ऑक्सिजन गरज भासायला लागली आहे. दिवसेंदिवस तुटवडा होत आहे. त्यामुळे आता या प्लांटचे महत्त्व पटवू लागले आहे. औरंगाबाद येथे अशाप्रकारचे २-३ प्लंट आहेत, संपूर्ण भारतात १०० पर्यंत असे प्लंट आहेत. युरोप व यूएसएमध्ये या प्लांटची टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी भारताने बनविली तर लवकर सप्लाय होऊ शकतो. किमान २ महिने या प्लांटच्या निर्मितीला लागतात.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा या प्रकल्पात बाहेरून हवा कॉंप्रेसरमध्ये ओढली जाऊन ती हवा एअर रिसिव्हरद्वारा एका टँकमध्ये गोळा केली जाते़ त्यानंतर एअर ड्रायरमध्ये हवा शुद्ध होऊन ती ड्राय युमूलिटी काढून शुद्ध हवा तयार केली जाते. हवेतील विषाणू बाहेर काढले जातात. स्टोरेज ऑक्सिजन टँकमधून सेंट्रलाईन पाईपद्वारा रुग्णापर्यंत तो पुरविला जातो़ या प्रकल्पाला वीज बील अधिक येत असले तरी वर्षभरात ऑक्सिजनवर होणारा खर्चापेक्षा फार कमी असल्यामुळे हा प्रकल्प लाभदायक आहे़

शिरपूर नगरपालिकेने ९ वर्षापूर्वीच ऑक्सिजनचा प्लांट उभारला आहे़ त्यासाठी कंप्रेसरच्या माध्यमातून वातावरणातील ऑक्सिजन शोषला जातो. त्यात नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्सिाइड शोषला जातो. परंतु प्लांटमधील वेगवेगळ्या फिल्टर यंत्रणेतून ऑक्सिजनचे विलगीकरण केले जाते आणि शुद्ध ऑक्सिजन शोषून तो सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना दिला जातो़

- भूपेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष