शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आवाज करणाऱ्या बुलेटमुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास; दोंडाईचामधील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2023 18:45 IST

ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून पोलिसांची वाहतूक शाखा प्रयत्नात असली तरी दोडाईचा व दोडाईचा परिसरात काही बुलेटस्वार त्यांच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून घेतात.

दोडाईचा (धुळे) : ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून पोलिसांची वाहतूक शाखा प्रयत्नात असली तरी दोडाईचा व दोडाईचा परिसरात काही बुलेटस्वार त्यांच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून घेतात. त्यामुळे प्रचंड आवाज करणाऱ्या या बुलेटमुळे कानठळ्या बसू लागल्या आहेत. ध्वनीप्रदूषण करणाऱ्या या बुलेट शौकीनांवर पोलिस कारवाई करतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रूबाबदार दुचाकी म्हणून बुलेटकडे पाहिले जाते. महाग असली तरी बुलेट खरेदीला अनेकजण विशेषत: तरूण प्राधान्य देत आहेत. मूळ बुलेटचा सायलेन्सरचा आवाज सौम्य असला तरी काहीजण या सायलेन्सरमध्ये बदल करून घेत आहे. त्यामुळे त्या बुलेट जोरजोरात आवाज करीत असतात. अशा आवाज करणाऱ्या बुलेट शहरातील विविध भागातून नेणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास आबालवृद्धांना  होत आहे. रुग्णालयासमोरून अशा बुलेट धावत असल्यामुळे रुग्णांच्या छातीचे ठोके आपोआप वाढतात. मात्र, दुचाकीवर राजरोसपणे कारवाई करणाऱ्या पोलिसांचा हात बुलटेधारकांसमोर आडवा होत नसल्याचे वास्तव  आहे.

बुलेटकडे  लक्ष वेधून घेण्यासाठी काही बुलेट चालकांनी सायलेन्सरमध्ये विनापरवाना तांत्रिक बदल केले आहेत.त्यामुळे फायरिंगचा कर्कश , फटाके फोडण्यासारखा आवाज येत असल्याची तक्रार आहे.  कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा,चिडचिडेपणा वाढत  आहे.  ही वाहने माेठ्या घरातील व्यक्तींची असल्याने यावर पोलीस,आरटीओ विभाग दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. एकीकडे काही शहरात फटफट आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावर वाहतूक पोलिसांनी  बुलडोजर फिरविल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र दोंडाईचात अशी कुठलीच कारवाई होताना दिसत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस