हॉटेलमध्ये दारु पिण्यास मनाई, वेटरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:40 PM2020-11-17T22:40:38+5:302020-11-17T22:42:36+5:30

आठ जणांना अटक, तणावाचे होते वातावरण

No drinking in the hotel, beating the waiter | हॉटेलमध्ये दारु पिण्यास मनाई, वेटरला मारहाण

हॉटेलमध्ये दारु पिण्यास मनाई, वेटरला मारहाण

Next

पिंपळनेर : जेवणासाठी हॉटेलमध्ये आलेल्यांना दारु पिण्यास मनाई केली म्हणून त्यातील एकाने वेटरवर चाकू हल्याचा प्रयत्न केला. तर, इतरांनी दोघांना मारहाण केल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जावून पोहचले. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा पिंपळनेरनजिक मैंदाणे शिवारात हॉटेल श्री बालाजी येथे आठ जणं जेवणासाठी आले होते. जेवण तयार होत असताना त्यांनी सोबत आणलेली दारु पित असल्याने वेटर रतन वैष्णव याने त्यांना मनाई केली. यावेळी राग येवून त्यातील जयेश बागूल याने किचनमधील चाकू आणून रतनवर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिनेश वैष्णव त्याच्या मदतीला धावून आला. शिवाय हॉटेलचे मालक सावरलाल घनश्याम वैष्णवा हे देखील पोहचले. मात्र, हा संतप्त समुदाय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. श्रीराम बागुल याने टेबलची फळी उचलून ती थेट मालकाच्या पाठीत टाकल्याने सावरलाल वैष्णवा हे जखमी झाले.
याप्रकरणी १५नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच याप्रकरणाचे तपासी अंमलदार पोलीस कर्मचारी सोनवणे यांनी तपासाची दिशा फिरवली. या घटनेतील सचिन धनाजी अहिरे (३१, रा. पहुबारा), विजय वसंत अहिरे (३२, रा. पहुबारा), राकेश अशोक पवार (५५, रा. मावचीपाडा), भाऊसाहेब भाईदास सूर्यवंशी (२२, रा. बोधगाव), जयेश लक्ष्मण बागूल (२१, रा. पहुबारा), सागर छोटीराम ठाकरे (२१, रा. बोधगाव), लखन गोविंदा बळीराम (२४, रा. बोधगाव), श्रीराम पंडीत बागूल (२३, रा. बोधगाव) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

Web Title: No drinking in the hotel, beating the waiter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे