शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

निजामपूरला दरोडेखोराला पाठलाग करुन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:36 IST

दरोडेखोर फरार : अपर अधीक्षकांच्या पथकासह एलसीबीची कारवाई

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने पकडले दोन पिस्तूल शहरातील गल्ली नंबर ५ मधील घड्याळवाली मशीदजवळ राहणारा मंगल गिरधर गुजर (३६) याच्या घरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, उपनिरीक्षक अनअपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कामगिरी शहरानजीक पारोळा चौफुलीवर गावठी पिस्तूल घेऊन एक जण येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली़ त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, उपनिरीक्षक भास्कर शिंदे, पंकज चव्हाण, मच्छिंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर/धुळे : निजामपूर (ता. साक्री) येथील पोलिसांच्या गस्ती पथकाने दरोडेखोरांचा मनसुबा गुरुवारी पहाटेच्या सुमारास  हाणून पाडला़  पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग केला. मात्र, पोलिसांना एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले, तर अन्य फरार झाले.  पकडलेल्या संशयित दरोडेखोराकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे़  दरम्यान, धुळे शहरात अपर पोलीस अधीक्षकांचे पथक  व स्थानिक गुन्हे शाखेनेही संशयितांकडून गावठी कट्टा व काही जिवंत काडतूस जप्त केले आहेत. निजामपूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे पहाटेच्यावेळी पेट्रोलिंग करत होते़ टिटाणे गावाच्या पूर्वेला जामदा रोडवर पाच ते सहा जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपली असल्याची गोपनीय बातमी मिळाली़ लागलीच दिलीप खेडकर यांनी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, हेड कॉन्स्टेबल अहिरे, पोलीस कर्मचारी बागुल, पिंजारी, ठाकरे, राठोड, शेंडगे, अहिरे यांच्यासह योगेश शिरसाठ, राहुल सानप, संजय जाधव, विशाल लोंढे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली़ रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपात दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे पोलिसांना आढळले़ पोलिसांनी हा परिसर चारही बाजूने घेरण्यास सुरुवात करताच झुडपातून अचानक ६ जण बाहेर आले़ त्यांनी पळ काढला असता त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला़ अंधाराचा फायदा घेऊन पाच जण पळून जाण्यास यशस्वी ठरले तर एक जण पोलिसांच्या ताब्यात सापडला़ त्याची चौकशी केली असता त्याने संतोष नामदेव भोसले (जामदा, ता़ साक्री)  असे आपले नाव असल्याचे सांगितले़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आढळला़ पळून गेलेल्यामध्ये राहुल चव्हाण, रमेश भार्इंदर चव्हाण, पी़ के़ पाटील, संतोष उर्फ सोयरा लक्ष्मण भोसले आणि जामदा येथील एक जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ घटनास्थळावरून एमएच १८-एव्ही ४४०५ आणि एमएच १९- बीडी ५६१९ अशा दोन दुचाकीसह मोबाइल, चाकू, मिरचीची पूड, गावठी कट्टा असे मिळून ९६ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेNijampurनिजामपूर