शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

प्रेमभंगातून नवविवाहितेचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 16:42 IST

शिरपुरातील घटना : मारेकरी प्रियकरानेच दिली युवतीच्या आईला माहिती, लग्नाच्या तिस-याच दिवशी लॉजमध्ये गळा दाबला 

ठळक मुद्देशिरपुरातील लॉजवर बोलवून नवविवाहितेचा दाबला गळा मारेक-यानेच युवतीच्या घरी दिली मोबाईलद्वारे माहिती घटनास्थळाचा पंचनामा, पोलीस घेताहेत मारेक-याचा शोध 

लोकमत आॅनलाईन शिरपूर : अवघ्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नाची हळदही न फिटलेल्या नवविवाहितेचा तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी शहरातील फाटा परिसरातील संगीता रेसिडेन्सी पार्कमध्ये उघडकीस आली. विशेष म्हणजे खून करणा-या प्रियकराने युवतीच्या आईला दूरध्वनी  करून आपण तिला जीवे ठार मारले, असे सांगितले. या घटनेमुळे युवतीचे कुटुंबीय हादरून गेले. या बाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे तातडीने घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी प्राथमिक माहिती घेत पंचनामा सुरू केला. तालुक्यातील जातोडा येथील रेणुका धनगर (२२) या युवतीचे २३ मार्च रोजी चोपडा येथील तरुणाशी विवाह झाला होता. तिचे शिरपुरातील नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याच्याशी लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. तिच्या विवाहातही शेटे उपस्थित होता. रविवार २४ रोजी रेणुका येथे माहेरी आली. सोमवारी सकाळी पप्पू शेटे याने तिला दूरध्वनी करून शिरपूर शहरात बोलवून घेतले. तिने शिरपूर येथे येताना मोबाईल घरी जातोडा येथेच ठेवला. सकाळी ९ वाजताच ती येथे पोहचली. ती व शेटे यांनी शिरपूर फाट्याजवळील संगीता रेसीडेन्सी पार्क या लॉजमध्ये रूम घेतली. तेथेच पप्पूने रेणुकाचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने लॉजच्या बाहेर येऊन रेणुकाच्या मोबाईलवर कॉल करून तिच्या आईला तुम्ही माझा रेणुकाशी विवाह होऊ दिला नाही, म्हणून मी तिला मारले. आता मी स्वत:ही आत्महत्या करत असल्याचे सांगून रेणुकाचा मृतदेह संगीता रेसीडेन्सी लॉजवर असल्याची माहिती दिली. या मुळे रेणुकाचे कुटुंबीय पुरते हादरून गेले. तिच्या आईने हंबरडाच फोडला. थोड्याचवेळात ही घटना कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात माहिती झाली. तेथूनच कोणीतरी शिरपूर पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे तत्काळ सहका-यांसह सदर लॉजवर पोहचले. तेथील एका खोलीत रेणुकाचा मृतदेह त्यांना आढळला. तिच्या अंगावरील हळद, नवी साडी, पायातील नवी चप्पल हे सर्व ती नववधू असल्याची साक्ष देत होते. दरम्यान रेणुकाचे नातलगही तेथे पोहचताच या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. पोलिसांनी तत्काळ त्या दिशेने तपास सुरू केला असून मारेकरी असलेल्या पप्पू शेटे याचा तपास केला जात आहे. दरम्यान उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संध्याकाळपर्यंत मारेक-याचा शोध लागलेला नव्हता.  

 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी