शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन इमारतीत स्वतंत्र ‘फायर सिस्टिम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:31 IST

महापालिका : पंप हाऊससह इमारतीच्या चारही बाजूस अत्याधुनिक ‘हायड्रंट’ यंत्रणा बसविणार

ठळक मुद्देअग्निशमन विभागाच्या यंत्रणेसाठी २० ते २५ हजार लीटरची स्वतंत्र पाण्याची टाकीआगीच्या ७९ घटना

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : मनपाची नवीन प्रशासकीय इमारत सध्या शाळा क्रमांक एकच्या जागेत आकारास येत आहे़ या इमारतीत स्वतंत्र व अत्याधुनिक ‘फायर सिस्टीम’ बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ ‘फायर हायड्रंट पंप सिस्टीम’ इमारतीत बसविली जाणार असल्याने चारही बाजूने इमारत अग्नीउपद्रवापासून सुरक्षित राहणार आहे़इमारतीचे काम पूर्णत्वासमनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सध्या शाळा क्रमांक एकच्या जागेत सुरू आहे़ इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले असून सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे तर फर्निचरच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे़ दरम्यान, मनपा अग्निशमन विभागानेदेखील नवीन इमारतीत ‘फायर सिस्टीम’ बसविण्याची तयारी केली असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे़ अग्निशमनचे ५ बंबअग्निशमन दलाकडे सध्या पाच मोठे बंब असून १ जीप आहे़ त्यात एका बंबाला एप्रिल महिन्यात अपघात झाला होता, त्याची दुरुस्ती लवकरच केली जाणार आहे़ तर जुन्या २ बंबांचे व १ टँकरचा लवकरच लिलाव केला जाणार आहे़ अग्निशमन विभागात ३५ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यात १ सहायक अग्निशमन अधिकारी, ३ लिडींग फायरमन, १० फायरमन, ४ क्लिनर, १६ चालक व १ आॅपरेटरचा समावेश आहे़  नवीन कार्यालय हवे!सध्या अग्निशमन विभागाचे कार्यालय शिवाजी रस्त्यावरील पांझरा जलकेंद्रालगत आहे़ परंतु त्याठिकाणी बंब लावण्यासाठी आवश्यक जागा व कर्मचाºयांना बसण्यासाठी, अग्निशमनचे साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने या कार्यालयाचे नूतनीकरण करण्याची मागणीही अग्निशमन विभागाची आहे़ आगीच्या ७९ घटनाएप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ७९ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे़

 

नवीन प्रशासकीय इमारतीत प्रस्तावित ‘फायर सिस्टीम’़़पंप हाऊस- तीन पंप कार्यरत केले जातील़पाण्याची टाकी- अग्निशमन विभागाच्या यंत्रणेसाठी २० ते २५ हजार लीटरची स्वतंत्र पाण्याची टाकी असेल़हायड्रंट/ यार्ड हायड्रंट सिस्टीम- सदर यंत्रणेव्दारे इमारतीच्या चारही बाजूस पाईप टाकलेले असतील़  सदर पाईपचा व्हॉल्व पंप हाऊसला जोडलेला असेल़ त्यामुळे अग्निउपद्रवात तत्काळ पाण्याची फवारणी होऊ शकते़ स्मोक डिटेक्टर- धूर निर्माण झाल्यास त्याची माहिती मिळणार असल्याने आगीची माहिती वेळीच मिळू शकेल़  फायर अलार्म- नवीन प्रशासकीय इमारतीत फायर अलार्मही बसविला जाणार आहे़ स्प्रिंकलर सिस्टीम- नवीन इमारतीत स्प्रिंकलरही बसविले जाणार आहेत़ फायर इस्टिंग्युशर- नवीन इमारतीच्या प्रत्येक भागात अग्निरोधक यंत्रही बसविण्यात येणार आहे़