धुळे : धनगर समाज बांधवांनी आपल्यातील सर्व शाखा-पोट शाखा विसरुन एकत्र येण्याची आवश्यकता आहे़ सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्यास समाजाचा विकास आहे़ असे मत धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील यांनी धनगर समाज परिचय मेळाव्यात व्यक्त केले़शहरातील कल्याण भवनात धनगर समाजाचा राज्यव्यापी उपवर-वधू यांचा परिचय मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाटील बोलत होते़ व्यासपीठावर पंचायत समितीचे सदस्य अशोक मुजगे, जळगाव येथील महामंत्री सुभाष सोनवणे, अकोला येथील माजी महापौर पुष्पा गुलवाडे यांच्यासह सुनील वाघ, त्र्यंबक पदमोर, रेखा न्याहळदे, विठा पाटील, अशोक बागुल, विठ्ठल लांडगे, रतिलाल पाटील, आनंदा देवरे, वसुंधरा लांडगे, संदिप मनोरे आदी उपस्थित होते़सभापती पाटील म्हणाले, धनगर समाजाने आपल्यातील सर्व शाखा पोटशाखा विसरण्याची गरज आहे़ यातून समाजाचीच हानी होत आहे़ लग्न जमत नसल्याचे यातून समोर येत आहे़ शिक्षण घेण्याची आवश्यकता असून सकारात्मक दृष्टीकोन बाळगायला हवा़या परिचय मेळाव्यात एकूण १०३ जणांनी आपला स्वत:चा परिचय करुन दिला़ त्यात ५७ उपवर होती तर ४६ उपवधू होत्या़यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करीत समाज प्रबोधनाचे काम केले़
सर्व शाखा विसरुन समाजाने एकत्र येण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:43 IST