डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयात नुकतेच महिला सक्षमीकरण व त्यापुढील आव्हाने या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र निळे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभारी प्राचार्या डॉ. शोभा चौधरी, सधन व्यक्ती म्हणून डॉ. आशा तिवारी यांनी वेबिनारमधील सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. आशा तिवारी यांनी म्हणाल्या की, एका बाजूला आपण स्त्री ही एक आदिशक्ती असून त्यांची पूजा करतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच स्त्रीला वेगळी वागणूक देऊन तिचा अपमान करतो.
भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांनी अनेक पदके मिळवून दिल्यानंतर सर्व ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो. मात्र, ज्या वेळेस या महिला स्पर्धेपूर्वी सराव करत असतात तेव्हा समाजातील अनेक घटक त्यांना प्रोत्साहित करण्यापेक्षा त्यांना चेष्टेचा विषय म्हणून पाहत असतात. हे कुठेतरी थांबणे गरजेचे असल्याचे सांगितले.