धुळे : बेशिस्त पार्किग, रस्त्यावरील सुसाट वाहने, फेरीवाल्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण अशा समस्या सोडविल्याशिवाय शहराला वाहतूक नियमांची शिस्त लागणार नाही़ त्यामुळे हे केवळ एकाच विभागाचे काम नाही तर वाहतुकीचा प्रश्न धसास लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागाचीही गरज आहे़ असा सूर ‘लोकमत’तर्फे आयोजित वाहतूक समस्यावरील चर्चासत्रात बुधवारी व्यक्त झाला.यावेळी महापालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस नाईक आऱ एस़ वाघ, यशदाचे समन्वयक तथा वाहतूक तंज्ञ डॉ़ योगेश सूर्यवंशी, कमलाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा जोशी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी हर्षकुमार रेलन, महापालिकेचे नगरसचिव मनोज वाघ आदी मान्यवर उपस्थित होते़शहरातील हॉकर्स झोन, चौकातील बंद पडलेले सिग्नल, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, पार्किगची समस्या, रस्त्यांचे रूंदीकरण अशा विविध प्रश्नांवर मान्यवरांनी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजना सूचविल्या़ त्यासाठी मनपा, शहर वाहतूक शाखा, व्यापारी तसेच वाहतूक तज्ञांची समिती स्थापन करण्याचा मानस व्यक्त झाला.जागा विकणाऱ्यांवर कारवाईआग्रारोड, पारोळारोड, पाच कंदील परिसरात व्यापारी फेरीवाल्यांना सातशे ते आठशे रूपयांना जागा विकतात़ त्यामुळे वाहतूकीची कोंडी होते़ ही समस्या ंसोडविण्यासाठी भाड्याने जागा विकत देणाºया व्यापाऱ्यांवर वाहतूक शाखा व महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग कारवाई करणार आहे़खरेदीसाठी आलेले ग्राहक व व्यापाºयांची वाहने दुकानांसमोर लावली जातात़ त्यामुळे वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी बाजारपेठेत लहान गल्ल्यांमध्ये दुचाकी पार्किगसाठी व्यवस्था करण्याचा निर्णय चर्चासत्रात घेण्यात आला.
वाहतुकीचा प्रश्न धसास लावण्यासाठी लोकसहभागाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:09 IST