शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

देशाला सावरकरांच्या कृतिशिल विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 16:10 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्ष दिलीप करंबेळकर यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देधुळ्यात स्वा.सावरकर साहित्य संमेलन सुरूसंमेलन नगरीला पु.भा.भावे यांचे नावसावरकरप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती

आॅनलाइन लोकमतधुळे : भारताला जगापुढे आदर्श म्हणून उभे करायचे असेल तर सावरकरांनी सांगितलेल्या विज्ञानवाद, राष्टÑवाद या  कृतीशिल विचारांची गरज आहे. तसेच समाजातील तळागाळात ज्ञानसंस्कृती रूजायची असेल तर जगातील अधिकाधिक ज्ञान स्वभाषेत आणले पाहिजे असे मत संमेलनाध्यक्ष तथा महाराष्टÑ राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी आज येथे केले. महाराष्टÑ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मुंबई-आग्रा रोडवर गुरूद्वारासमोर असलेल्या  कान्हा रिजेन्सी येथे हे साहित्य संमेलन सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकू इदाते, सरचिटणीस रवींद्र साठे, देवगिरी प्रांत संचालक मधुकर जाधव, महापौर चंद्रकांत  सोनार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक,  उपाध्यक्ष सुभाष अग्रवाल, सचिव हर्षल विभांडीक होते. दीपप्रज्वलन व सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाला सुरूवात झाली.दिलीप करंबेळकर पुढे म्हणाले की,  विसाव्या शतकाने राष्टÑवादाची अनेक रूपे पाहिली. काही देशांचा साम्राज्यवादी तर काही देशांचा वंशवादी राष्टÑवाद होता. सावरकरप्रणीत राष्टÑवाद हा गुणात्मकरित्या इतर राष्टÑवादाहून वेगळा होता.  भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनायक सहस्त्रबुद्धे म्हणाले, सावरकरांनी विज्ञानाची, आधुनिकतेची कास धरली होती. सावरकरांनी समाजकारण, राजकारण व वाड.मयनिर्मितीत उल्लेखनीय कामगिरी केली. देशभक्ती हा त्यांचा प्राण होता. सावरकरांचे विचार अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकणार आहेत. प्रास्ताविक रवींद्र साठे यांनी तर सूत्रसचांलन नम्रता पाटील, पंकज चौधरी यांनी तर आभार सुभाष अग्रवाल यांनी मानले.  

टॅग्स :Dhuleधुळे