लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी सोमवारी पदासह पक्षाचा राजीनामा दिला़ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता़ गेल्या दोन महिन्यांपासून मोरे हे अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा होती़ शिवाय मोरे हे पक्षापासून अंतर राखून होते़ पक्षात गेल्या काही महिन्यांपासून घुसमट होत असल्याने नाईलाजाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे़ राजवर्धन कदमबांडे यांनी मला मुलासारखे सांभाळले असून माझ्यावर त्यांनी नितांत प्रेम केले़ त्यामुळे त्यांच्याबद्दल मनपात कोणताही किंतू, परंतु नाही़ पक्ष सोडला तरी त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणार नाही, असे मोरे यांनी म्हटले आहे़ अन्य पक्षात जाण्याबाबत निर्णय घेतला नसून असे मोरे यांनी म्हटले आहे़
धुळयात राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 17:44 IST
घुसमट होत असल्याने मनोज मोरेंची पक्षाला सोडचिठ्ठी
धुळयात राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
ठळक मुद्दे- दोन महिन्यांपूर्वी नगरसेवक पदाचा दिला होता राजीनामा- राजवर्धन कदमबांडे यांच्याबद्दल नितांत आदर- अन्य पक्षात जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही