शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश शार्दुल भाजपच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 12:51 IST

आमदार अनिल गोटेंची घेतली सदिच्छा भेट, स्वपक्षाच्या नेतृत्वावर नाराजी

ठळक मुद्देनगरसेवक दिनेश शार्दुल भाजपच्या वाटेवरसुतार समाजाला सावत्रपणाची वागणूकआमदार अनिल गोटेंची घेतली सदिच्छा भेट

धुळे : महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश शार्दुल यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत भाजपची वाट धरली आहे़ सोमवारी शार्दुल यांनी आमदार अनिल गोटे यांची सदिच्छा भेट घेतली़महापालिकेत तब्बल ३६ नगरसेवक निवडून आणत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली़ मात्र मनपाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विकास कामे न होणे, पक्ष नेतृत्वाकडून पदे वाटपातून होणारी नाराजी, केंद्रात आणि राज्यात भाजपची वाटचाल लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला़  केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर अन्य पक्षातील नगरसेवकांनी देखील आपापल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे़ त्यात राष्ट्रवादीच्या माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर फारूख शाह, नगरसेवक सतिश महाले, माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे, शहर विकास आघाडीचे नगरसेवक फिरोज लाला,  जुलाहा रश्मीबानो, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते संजय जाधव यांचा समावेश आहे़ तर अलिकडेच झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांनी भाजप उमेदवाराला मतदान करून नाराजी व्यक्त केलेली असतांनाच आता प्रभाग क्रमांक २९ अ मधील नगरसेवक दिनेश शार्दुल यांनी देखील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे़ अर्थात, शार्दुल यांचा भाजपात अधिकृत पक्ष प्रवेश अद्याप झाला नसला तरी ते भाजपच्या वाटेवर आहेत़

 

राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी सभागृह नेते पदाबाबत दिलेला शब्द पाळला नाही़ त्यामुळे आमच्या सुतार समाजाकडून नाराजी व्यक्त झाली आहे़ पक्ष नेतृत्वाकडून मिळणाºया सावत्रपणाच्या वागणुकीमुळे भाजपात प्रवेश करणार आहे़ त्यादृष्टीने सोमवारी आमदार अनिल गोटे यांची भेट घेतली आहे़- दिनेश शार्दुल़