लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विखरण ता़ शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या अंत्यसंस्कारानंतर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांची भूमिका प्रसार माध्यमासमोर मांडली़ तेव्हा त्यांनी दोंडाईचा न्यायालयात माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुध्द अबु्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले़ दोंडाईचा येथे उभारण्यात येणाºया सौर उर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून पाठपुरावा करणारे विखरण ता़ शिंदखेडा येथील वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील (८०) यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री रावल यांनी भूमिका विषद केली़ माजी मंत्री नवाब मलिक यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर मुंबईत आरोप केले़ त्यावर मंत्री रावल यांनी मलिक यांचा समाचार घेतला़ मलिक यांनी माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरुन त्यांनी हा आरोप केला असावा अशी शक्यता आहे़ आमचे कार्यकर्ते आजच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करतील, असेही मंत्री रावल यांनी सांगितले़
नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 12:52 IST
जयकुमार रावल : धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कारावेळी मांडली भूमिका
नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार
ठळक मुद्देमंत्री जयकुमार रावल यांनी घेतला नवाब मलिक यांचा समाचारआरोपाला उत्तर देत गुन्हा दाखल करण्याचा इशाराआरोप-प्रत्यारोपामुळे प्रकरण गाजण्याची शक्यता