आॅनलाइन लोकमतधुळे- मराठा सेवा संघाच्या राष्टÑीय ग्रामीण महाअधिवेशनला रविवारी थाटात सुरूवात झाली.महाअधिवेशनाचे उदघाटन रामदास उर्फ शिवराज महाराज जाधव यांच्याहस्ते झाले. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घोगरे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, मराठा सेवा संघाचे सचिव सोमनाथ लडके,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम निकम, जि.प. सदस्य देवीदास सोनवणे, पराग बेडसे, बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करतांना शिवराज महाराज जाधव म्हणाले, सर्व पोटजाती विसरून मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.या महाअधिवेशनासाठी राज्यातील विविध भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथे मराठा सेवा संघाच्या राष्टÑीय महाअधिवेशनला थाटात सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:26 IST