शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

हर्बल औषधीवर राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:28 IST

पटेल फार्मसी महाविद्यालय : १७० विद्यार्थ्यांचा सहभाग, ९८ पोस्टर सादर

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हर्बल मेडिसिन याविषयावर राष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी परिसंवादात उस्फुर्तपणे सहभाग घेतला.परिषदेचे उद्घाटन मुंबई येथील अविनाश देवधर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, प्राचार्य डॉ.एस.बी. बारी, प्राचार्य डॉ.एस.जे. सुराणा, नागपूर येथील डॉ. रेणुका दास, परिषदेचे संयोजक प्रा.चेतन भावसार, समन्वयक प्रा.राकेश मुथा आदी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील यांनी इंग्रज भारतात येण्याअगोदरची व नंतरची परिस्थिती यावर भाष्य करत आपण नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन करून आपल्याकडे उपलब्ध हर्बल मेडिसिनचा वापर व विपणन करून देशाचा जी.डी.पी. वाढवला पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ.रेणुका दास यांनी हर्बल संशोधनचे व हर्बल औषधीचे अलीकडील ट्रेंड या विषयावर मार्गदर्शन केले.पोस्टर सादरीकरण सर्धेत १७० विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत ९८ पोस्टर सादर केले. सदर स्पर्धा वेगवेगळ्या पाच विषयात घेण्यात आली़ परीक्षक म्हणून डॉ.आर.एम. पाटील, डॉ.एम.जी. कळसकर, डॉ.एस.डी. फिरके, डॉ.एच.एम. पटेल, डॉ.एच.एस. महाजन, डॉ.आर.ओ. सोनवणे, प्रा.एम.बी. गगराणी, प्रा.यु.बी. महाजन, डॉ.जे.पी. महाशब्दे व डॉ.एस.पी. पाटील यांनी काम पहिले. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत फार्माकोग्नोसी विषयात सुषमा गुजर व भावेश ढोले यांनी प्रथम, विशाल चौधरी व पूजा अमृतकर यांनी द्वितीय पारितोषिक मिळविले. फार्मासुटीकाल केमिस्ट्री विषयात अश्विनी मोरे व सागर पाटील यांनी प्रथम, काजल जैन व सागर कोठारी यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. फार्मासुुटिक्स विषयात भाग्यश्री पाटील, रुपाली शिरसाठ, कल्पेश पाटील यांनी प्रथम तर अपूर्वा पाटील, गजानन धर्मे यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. फार्माकोलोजी विषयात मीनाक्षी शर्मा यांनी प्रथम व जितेंद्र सोनवणे यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. विज्ञान विषयात अविनाश टट्टू प्रथम तर प्रियांका कापडे व संपदा पाटील यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले.

टॅग्स :Dhuleधुळे