धुळे : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी महापालिकेकडून मालमत्ता करात सवलत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती उपायुक्त शिल्पा नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात बोलताना दिली. देवपुरातील प्राेफेसर काॅलनीतील प्राेफेसर काॅलनी ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा संघाचे अध्यक्ष ॲड. ए. बी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी शिल्पा नाईक बाेलत हाेत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जनसेवा फाउंडेशन, पुणे विभागाचे राहुल पवार, प्राचार्य व्ही. के. भदाणे, चंद्रशेखर मुडावदकर, मंगला लाेहार, आदी उपस्थित हाेते. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना उपायुक्त नाईक यांनी मार्गदर्शन केले. राहुल पवार यांनी विविध सरकारी विभाग, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी माेफत हेल्पलाईनची माहिती दिली.
महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्याबाबत प्रयत्न केले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST