महापालिका करणार दररोज अडीच हजार फेरीवाल्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:36 AM2021-03-26T04:36:02+5:302021-03-26T04:36:02+5:30

जिल्हाधिकारी संजय यादव यांनी बुधवारी दिल्याने मनपा प्रशासन कामाला लागले आहे. त्यानुसार दररोज अडीच हजार फेरीवाल्याने तपासणी केली जाणार ...

Municipal Corporation will inspect two and a half thousand peddlers every day | महापालिका करणार दररोज अडीच हजार फेरीवाल्यांची तपासणी

महापालिका करणार दररोज अडीच हजार फेरीवाल्यांची तपासणी

Next

जिल्हाधिकारी संजय यादव यांनी बुधवारी दिल्याने मनपा प्रशासन कामाला लागले आहे. त्यानुसार दररोज अडीच हजार फेरीवाल्याने तपासणी केली जाणार आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे धुळे शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक फेरीवाला, भाजीपाला, दूध, फळविक्रेता, सर्व दुकानदार, दुकानातील कामगारांची रॅपिड अँटिजेन चाचणी मोहीमस्तरावर करावी. कन्टेन्मेंट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिरपूरमध्ये ऑक्सिजनयुक्त १०० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करावे.

खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता नसताना ऑक्सिजनयुक्त बेड अडविणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. कोविड केअर सेंटरमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव दर्शनी भागावर संपर्क क्रमांकासह प्रदर्शित करावे. याशिवाय कोविड केअर सेंटरच्या प्रभारी अधिकाऱ्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे. याबाबतचा पूर्तता अहवाल तातडीने सादर करावा. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दर्शनी भागावर बिलाबाबत तक्रार असल्यास कोणाकडे संपर्क साधावा याविषयीचा फलक लावण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Municipal Corporation will inspect two and a half thousand peddlers every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.