आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे): तालुक्यातील करवंद येथे डिसेंबर २०१९मध्ये एका अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलींचा लैगींक छळाचा प्रकार घडला होता़ त्या मुलाविरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत कारवाई देखीलकरण्यात आली आहे़ मात्र त्यास जेरबंद न करण्यात आल्यामुळे करवंद गावातील रहिवाशांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी करवंद गावात आक्रोश मोर्चा काढून पोलिस प्रशासनाला निवेदन दिले़गेल्या २८ डिसेंबर रोजी करवंद गावातील एका अल्पवयीन मुलाकडून गावातीलच एका अल्पवयीन आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती़या संदर्भात शिरपूर पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ परंतु ‘त्या’ अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही़ त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी गावातील काही जणांवर दबाव आणण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले असल्याच्या निषेधार्थ करवंद गावात गावातील काही महिला व पुरूषांनी १२ रोजी गावातून आक्रोश मोर्चा काढला़त्यानंतर येथील गुजराथी कॉम्पलेक्स येथे पुन्हा जमा होवून मेनरोड मार्गाने आक्रोश मोर्चा काढला़ मोर्चेकरांनी डीवायएसपी अनिल माने यांना या संदर्भातले निवेदन दिले़निवेदनावर प्रकाश हरी पाटील, उपेंद्र धनराज पाटील, संजय उत्तम पाटील, लक्ष्मण बाजीराव पाटील, सुनिल लक्ष्मण पाटील, भटू अधिकार पाटील, संदीप पाटील आदींच्या स्वाक्षºया आहेत़मुलास ताब्यात घेणार : मानेमाने यांनी सांगितले की, गुन्हेगार अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्यास अज्ञात स्थळी नेले आहे़ असे असले तरी पोलिस त्याचा शोध घेत आहे़ लवकरच त्या मुलास ताब्यात घेण्यात येईल.
पीडितेला न्याय मिळावा यासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:34 IST