लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील बोरीस येथील बौध्द विहारच्या जागेच्या मागणीसाठी बौध्दजन संग्राम समितीने आक्रमक होत धुळ्यात शुक्रवारी धरणे आंदोलन केले़ यानंतर प्रशासनाला निवेदन सादर केले़बोरीस येथील बौध्दविहारच्या मागणीसाठी मागासवर्गीयांच्या सांस्कृतिक कामासाठी तसेच विकास कामांसाठी बोरीस ग्रामपंचायत नाहरकत देत नाही़ त्यासाठी गट नंबर ७९२ गावठाण म्हसनवट ही जागा बौध्दविहारासाठी मिळावी़ म्हणून बोरीस गावातील बौध्दजन संग्राम समितीच्यावतीने धुळ्यातील क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी चंद्रवीर सावळे, नानाभाऊ बोरसे, दिलीप बोरसे, एऩ जी़ बोरसे, दिलीप बोरसे, मोहनसिंग गिरासे, अॅड़ विशाल साळवे, सुनील बोरसे सहभागी झाले होते़ यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले़
बोरीसच्या बौध्दविहार जागेसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:24 IST