शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गौण खनिजासाठी पोखरले जाताय डोंगर

By admin | Updated: May 19, 2017 17:49 IST

याकडे प्रशासनातील अधिका:यांचे अक्षम्य दुर्लक्ष

ऑनलाइन लोकमतकापडणे, जि. धुळे, दि. 19 -  धुळे तालुक्यातील सोनगीर गाव परिसरातील डोंगर फोडून अवैध व चोरटय़ा मार्गाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मात्र याकडे प्रशासनातील अधिका:यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सोनगीर येथील पोलीस स्टेशनच्या मागे मोठा डोंगर आहे. तेथून दगड, मुरूम, मातीची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे.  दोन ते तीन ट्रॅक्टर व जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने येथील गौण खनिज नैसर्गिक साधन संपत्तीची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले.  जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने येथील सर्वच डोंगर फोडले जात आहेत. मिळेल त्या वाहनाने येथील डोंगराचा फोडलेला मुरुम काढून दिवसा शासकीय मालमत्तेची चोरी केली जात आहेत.घटनास्थळी एक जे.सी.बी. मशिन डोंगर फोडून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत मुरूम भरण्याचे काम करीत होते. या वेळेस येथे दोन ते तीन ट्रॅक्टरही मुरुम भरण्यासाठी होते. मात्र, यातील एकाही ट्रॅक्टर व ट्रॉलीला नंबर प्लेटा नव्हत्या. चालकांचादेखील चेहरा ओळखता येऊ, नये म्हणून केवळ डोळयाने दिसेल ऐवढाच भाग मोकळा ठेवत तोंडावर संपूर्ण रुमाल बांधलेला दिसत होता.  सर्वच डोंगर पोखरले गेले तर पर्यावरणाचा मोठा :हास होणार आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून पर्यावरणीय जैवविविधतेची साखळीच नष्ट होऊन व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नुकसानीचे परिणाम सर्वानाच भोगावे लागणार आहेत. डोंगर नष्ट झाल्यामुळे येथील मृदेची धूप होवून मृदा देखील कमी होईल. डोंगरांमुळे निसर्गाचे पावसाळी पाणी अडवण्यास फायदा होतो व नदी नाल्यांना पाणी येवून लहान मोठी धरणेही या डोंगरांमुळे भरले जात असतात. डोंगर असल्यामुळे जमिनीत पाणी मुरले जाते व जमिनीत पाण्याची पातळी टीकवून ठेवण्यास मदत होते. पाणी टंचाईशी सामना करण्यास डोंगरांमुळे फायदाच होत असतो. 2 ते 31 मेपयर्ंत मी रजेवर आहे म्हणून मी काही कार्यवाही करू शकत नाही. एक ट्रॅक्टरला दंड म्हणून सात हजार 400 रुपये याप्रमाणे सरकारी दंड आकारला जाऊ शकतो व संबंधितांवर तसेच जे.सी.बी. चालक, मालकावरदेखील चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल करता येतील, असे मंडळ अधिकारी  डिगंबर आर. ठाकूर यांनी सांगितले.