धुळे - लसीकरणात सोमवारी जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तब्बल ८६४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली. १४४ टक्के इतके लसीकरण झाले. जिल्हा रूग्णालयात सर्वाधिक ३०० कर्मचाऱ्यांनी लस घेतली. महानगर पालिकेच्या प्रभात नगर येथील आरोग्य उपकेंद्रात १२० जणांनी लस घेतली. मच्छीबाजार येथे १५८, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय ११४, साक्री ६८ व दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात १०४ जणांनी लस घेतली.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचण्यात येत आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आशा स्वयंसेवीका यांनाही लस देण्यात येत आहे. रूग्ण दुपटीचा कालावधी व कोरोनामुक्त रूग्णांच्या प्रमाणातही जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली होती.